उघड्या बाल्कनीतून थेट घरात शिरला
मिळालेल्या माहितीनुसार, प्रांजल चव्हाण हे आपल्या कुटुंबासह घरी असतानाच ही घटना घडली. घराच्या बाल्कनीचा दरवाजा उघडा असल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी संधी साधत घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाटात ठेवलेली 13 हजार 500 रुपयांची रोख रक्कम तसेच सुमारे एक हजार रुपये किमतीची चांदीची मूर्ती चोरून नेली.
advertisement
चोरी झाल्याचे लक्षात येताच प्रांजल चव्हाण यांनी तात्काळ कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी करण्यात येत असून संशयितांचा शोध घेतला जात आहे.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. उघड्या बाल्कनी, खिडक्या आणि दरवाजांमुळे चोरट्यांना सहज संधी मिळत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पोलिसांनी नागरिकांना घराची योग्य काळजी घेण्याचे तसेच रात्रीच्या वेळी दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.
