TRENDING:

Tata चा नाद करतीये का? आणखी एक SUV निघाली टँकसारखी मजबूत, सेफ्टीमध्ये 5 स्टार रेटिंग!

Last Updated:
मजबूत आणि दणकट अशा अनेक गाड्या टाटा मोटर्सने दिल्या आहे. आता आणखी एक ईलेक्ट्रिक कार या दणकट एसयूव्हीमध्ये सामील झाली आहे.
advertisement
1/7
Tata चा नाद करतीये का?आणखी एक SUV निघाली टँकसारखी मजबूत, सेफ्टीमध्ये 5 स्टार
टाटा मोटर्सच्या कार या सेफ्टीसाठी ओळखल्या जातात. मजबूत आणि दणकट अशा अनेक गाड्या टाटा मोटर्सने दिल्या आहे. आता आणखी एक ईलेक्ट्रिक कार या दणकट एसयूव्हीमध्ये सामील झाली आहे. Tata Harrier ev ला आता ५ स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. टाटा हॅरियर.ईव्ही. नुकतीच लाँच झाली होती. आता tata harrier ev ने भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (भारत एनसीएपी) च्या क्रॅश टेस्टमध्ये ५ स्टार घेऊन पास झाली आहे.
advertisement
2/7
अलीकडेच लाँच झालेली टाटा हॅरियरची इलेक्ट्रिक व्हर्जनने भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (भारत एनसीएपी) मध्ये अॅडल्ट ऑक्युपंट प्रोटेक्शन (एओपी) आणि चाइल्ड ऑक्युपंट प्रोटेक्शन (सीओपी) दोन्ही श्रेणींमध्ये ५-स्टार सेफ्टी रेटिंग मिळविण्यात यशस्वी झाली आहे.
advertisement
3/7
हॅरियर.ईव्हीने एओपी श्रेणीमध्ये ३२.०० पैकी ३२.०० आणि सीओपी श्रेणीमध्ये ४९.०० पैकी ४५.०० गुण मिळवले. टाटा हॅरियर.ईव्हीने फ्रंटल आणि साइड इम्पॅक्ट चाचण्यांमध्ये १६/१६ चा परिपूर्ण स्कोअर मिळवला.
advertisement
4/7
सुरक्षिततेच्या बाबतीत, SUV ला लेव्हल २ ADAS मिळते, ज्यामध्ये अ‍ॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन कीप असिस्ट आणि पादचाऱ्यांसाठी, सायकलस्वारांसाठी आणि समोरील वाहनांसाठी ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग सारख्या २०+ फिचर्स समाविष्ट आहेत.
advertisement
5/7
Harrier.ev मध्ये सात एअरबॅग्ज (गुडघ्याच्या एअरबॅगसह), i-VBAC सह ESP, AVAS, टायर प्रेशर मॉनिटरिंग, रेन-सेन्सिंग वायपर्स, ऑटो हेडलॅम्प आणि SOS कॉलिंग देखील आहेत.
advertisement
6/7
कंपनीने २३ जून रोजी अधिकृतपणे Harrier.ev च्या सुरुवातीच्या किमती जाहीर केल्या. Harrier.ev च्या रियर-व्हील ड्राइव्ह (RWD) प्रकारांसाठी बुकिंग २ जुलैपासून सुरू होईल, तर क्वाड-व्हील ड्राइव्ह (QWD) प्रकारांसाठीच्या किमती २७ जून २०२५ रोजी जाहीर केल्या जातील.
advertisement
7/7
किंमत किती? Tata Harrier.ev ची Adventure 65 ची किंमत 21.49 लाख तर Adventure S 65 ची किंमत 21.99 लाख एक्स शोरूम आहे. तर Fearless+ 65 ची किंमत 23.99 लाख इतकी आहे आणि Fearless+ 75 या टॉप मॉडेलची किंमत 24.99 लाख आणि Empowered 75 मॉडेलची किंमत 27.49 लाख इतकी आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Tata चा नाद करतीये का? आणखी एक SUV निघाली टँकसारखी मजबूत, सेफ्टीमध्ये 5 स्टार रेटिंग!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल