TRENDING:

Bike Tips: हिवाळ्यात बाइक बंद पडण्याची ही 5 कारणं, 99 टक्के लोकांकडून होते चूक!

Last Updated:
थंडीच्या काळात नेहमी कार असेल किंवा बाइक असेल, सुरू करण्यात अडचणी येतात. बऱ्याच वेळा तर वाहनं सुरूच होत नाही.
advertisement
1/7
Bike Tips: हिवाळ्यात बाइक बंद पडण्याची ही 5 कारणं, 99 टक्के लोकांकडून होते चूक!
दिवाळी संपल्यानंतर आता सर्वत्र थंडी वाढत चालली आहे. पावसाने कुठे हजेरी जरी लावली असली तरी ग्रामीण भागात थंडीची तीव्रता वाढत चालली आहे. थंडीच्या काळात नेहमी कार असेल किंवा बाइक असेल, सुरू करण्यात अडचणी येतात. बऱ्याच वेळा तर वाहनं सुरूच होत नाही.
advertisement
2/7
त्यामुळे अनेकांना ऑफिसला जायला नेहमी उशीर होतो. जरी थंडीमुळे वाहनं बंद पडण्याचं कारण असेल पण यामागे आणखी काही कारण आहे, जी बऱ्याच लोकांना माहिती नाही
advertisement
3/7
1) इंजिन ऑइल घट्ट होणे  बऱ्याच वेळा हिवाळ्यामध्ये थंडीमुळे इंजिनमधील इंजिन ऑईल हे खूप घट्ट होऊन जातं. घट्ट झालेलं इंजिन ऑइल हे इंजिनमध्ये सगळ्या पार्टमध्ये पोहोचत नाही. त्याामुळे इंजिनला फिरण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त जोर लावावा लागतो. याच कारणामुळे कार असेल किंवा बाईक असेल सेल्फ किंवा किक मारल्यावर लगेच सुरू होत नाही.
advertisement
4/7
2) बॅटरी कमकुवत किंवा डिस्चार्ज होणे हिवाळ्यामध्ये नेहमी कार असेल किंवा बाईक असेल बॅटरीमध्ये बिघाड होण्याचं प्रमाण हे सर्वाधिक असतं.  हिवाळ्यात बॅटरीची ताकद ही कमी होते. जर तुमची सेल्फ-स्टार्ट बाइक असेल तर जास्त अडचणी येतील. हिवाळ्यात कमी तापमान झाल्यामुळे बॅटरीमध्ये रासायनिक क्रिया मंदावते, ज्यामुळे ती कमी करंट तयार होतं.
advertisement
5/7
जर तुमची बॅटरी आधीच जुनी किंवा कमकुवत असेल, तर थंडीत ती सेल्फ-स्टार्ट मोटरला फिरवण्यासाठी पुरेशी शक्ती देऊ शकत नाही, परिणामी बाईक सुरू होत नाही.
advertisement
6/7
4. फ्यूल-एअर मिक्सचरमध्ये बिघडणे - इंजिन सुरू होण्यासाठी हवा आणि पेट्रोल यांचे योग्य प्रमाणात मिश्रण आवश्यक असतं. थंडीत इंजिन थंड असल्यानं, ते सुरू होण्यासाठी त्याला थोडे जास्त इंधन लागतं. जर तुम्ही 'चोक'चा वापर केला नाही, तर इंजिनला पुरेसं इंधन मिळत नाही.
advertisement
7/7
फ्यूल इंजेक्शन  असलेल्या बाईकमध्ये लावलेला तापमान सेन्सर खराब झालं असल्यास तो इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिटला थंड हवामानासाठी योग्य मिश्रण तयार करण्याचा निर्देश देऊ शकत नाही, ज्यामुळे स्टार्ट करताना समस्या येते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Bike Tips: हिवाळ्यात बाइक बंद पडण्याची ही 5 कारणं, 99 टक्के लोकांकडून होते चूक!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल