TRENDING:

"त्याने मला प्रपोज केलं आणि मी 'हो' म्हणाले..." अनुष्का शेट्टीने वयाच्या 43 व्या वर्षी सांगून टाकली पहिल्या प्रेमाची फिलिंग

Last Updated:
प्रभासचं नाव बाजूला ठेवा, अनुष्का चक्क एका दुसऱ्याच व्यक्तीच्या प्रेमात पडली होती आणि तेही अगदी लहान वयात, काय आहे हे प्रकरण? आणि कोण आहे ती व्यक्ती जाणून घेऊया.
advertisement
1/7
'त्याने मला प्रपोज केलं आणि..' अनुष्का शेट्टीने सांगितली पहिल्या प्रेमाची फिलिंग
सिनेविश्वात काही अभिनेत्री अशा असतात ज्या केवळ पडद्यावरच नाही, तर प्रेक्षकांच्या मनावरही राज्य करतात. आपल्या सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने दाक्षिणात्य सिनेमात क्रांती घडवणारी अशीच एक अभिनेत्री म्हणजे 'देवसेना' म्हणजेच अनुष्का शेट्टी. गेल्या अनेक वर्षांपासून अनुष्काचं नाव सुपरस्टार प्रभाससोबत जोडलं जात आहे. चाहत्यांना प्रतीक्षा आहे ती त्यांच्या लग्नाची. मात्र, या सगळ्या चर्चांदरम्यान अनुष्काने स्वतःच्या खाजगी आयुष्याबद्दल एक असा खुलासा केला आहे, ज्याने सध्या सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.
advertisement
2/7
प्रभासचं नाव बाजूला ठेवा, अनुष्का चक्क एका दुसऱ्याच व्यक्तीच्या प्रेमात पडली होती आणि तेही अगदी लहान वयात, काय आहे हे प्रकरण? आणि कोण आहे ती व्यक्ती जाणून घेऊया.
advertisement
3/7
रजनीकांत, विजय, नागार्जुन आणि प्रभास यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम करणाऱ्या अनुष्काचं वय आज 43 वर्ष आहे, तरीही ती अविवाहित आहे. 'बाहुबली' चित्रपटानंतर अनुष्का आणि प्रभास लग्न करणार अशा चर्चांना उधाण आलं होतं. त्यांच्यातील मैत्री आणि केमिस्ट्री पाहून चाहत्यांना ती जोडी परफेक्ट वाटली. पण अनुष्काने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या 'पहिल्या प्रेमाचा' किस्सा सांगून सगळ्यांना चकित केलं आहे.
advertisement
4/7
अनुष्काने तिच्या बालपणीची एक गोड आठवण शेअर केली. ती म्हणाली, "मी तेव्हा फक्त सहावीत शिकत होते. एक मुलगा माझ्याकडे आला आणि त्याने मला 'आय लव्ह यू' म्हटलं. त्या वयात मला त्या शब्दाचा अर्थही नीट माहीत नव्हता. पण जेव्हा त्याने तसं विचारलं, तेव्हा मी निरागसपणे 'ठीक आहे' (Okay) म्हणून टाकलं." अनुष्काच्या मते, तिच्या आयुष्यातील ही सर्वात सुंदर आणि निरागस आठवण आहे.
advertisement
5/7
अनुष्का केवळ ग्लॅमरस अभिनेत्री नाही, तर ती एक समर्पित कलाकार आहे. 'अरुंधती' सिनेमाने तिला वेगळी ओळख दिलीच, पण 'इंजी इदुप्पझगी' (Inji Iduppazhagi) या चित्रपटासाठी तिने जे केलं, ते कोणतीही अभिनेत्री सहजासहजी करत नाही. या भूमिकेसाठी तिने स्वतःचं वजन प्रचंड वाढवलं होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जरी चालला नाही, तरी तिच्या धाडसाचं कौतुक संपूर्ण इंडस्ट्रीत झालं.
advertisement
6/7
बॉक्स ऑफिसवर 'देवसेना'ची सध्याची स्थिती'बाहुबली 1' आणि 'बाहुबली 2' मधून जगभरात विक्रम प्रस्थापित केल्यानंतर अनुष्का मोठ्या पडद्यावरून काही काळ लांब होती. मोठ्या ब्रेकनंतर तिने 'मिस शेट्टी मिस्टर पॉली शेट्टी' मधून पुनरागमन केलं. मात्र, तिचा नुकताच प्रदर्शित झालेला 'घाटी' हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया मिळवत आहे.
advertisement
7/7
अनुष्का शेट्टी आजही लाखो तरुणांच्या हृदयाची धडकन आहे. प्रभाससोबतचं तिचं नातं असो किंवा तिच्या पहिल्या प्रेमाचा हा किस्सा, अनुष्का नेहमीच चर्चेत असते. आता चाहत्यांना ओढ लागली आहे ती तिच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने 'बाहुबली' कधी येणार याची.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
"त्याने मला प्रपोज केलं आणि मी 'हो' म्हणाले..." अनुष्का शेट्टीने वयाच्या 43 व्या वर्षी सांगून टाकली पहिल्या प्रेमाची फिलिंग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल