44 वर्षांच्या धोनीचा ही आयपीएल शेवटची असेल, या आयपीएलनंतर धोनी निवृत्ती घेईल, असं बोललं जात होतं. पण दुखापतीमुळे धोनी पहिले दोन आठवडे स्पर्धेतून बाहेर झाला आहे. धोनीची दुखापत बघता दोन आठवड्यानंतर तरी कमबॅक करणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे धोनीचा समोर आलेला एक व्हिडिओ.
advertisement
चेन्नई सुपरकिंग्स शुक्रवार 3 एप्रिला पंजाब किंग्सविरुद्ध चेन्नईच्या एम.ए.चिदंबरम स्टेडियमवर सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी सीएसकेची टीम चेन्नईमध्ये दाखल झाली, तेव्हा टीमचे सर्व खेळाडू बसमधून उतरले. या बसमधून धोनीही उतरत होता, पण पायाच्या दुखापतीमुळे त्याला उतरताना वेदना होत होत्या. धोनीचा बसमधून उतरतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून धोनीच्या चाहत्यांनाही वेदना होत आहेत.
पहिल्या सामन्यात सीएसकेचा पराभव
आयपीएलच्या पहिल्या सामन्यात राजस्थानविरुद्ध चेन्नई सुपरकिंग्सला पराभवाचा धक्का बसला. राजस्थानविरुद्धच्या या सामन्यात पहिले बॅटिंग करणाऱ्या सीएसकेचा फक्त 127 रनवर ऑलआऊट झाला, या आव्हानाचा पाठलाग राजस्थानने 12.1 ओव्हरमध्येच पार केला. राजस्थान आणि चेन्नई यांच्यात गुवाहाटीमध्ये हा सामना पार पडला, दुखापतीमुळे धोनी या सामन्यासाठी गुवाहाटीला गेला नव्हता. आता पंजाबविरुद्धचा सामना चेन्नईमध्ये होत आहे, त्यामुळे धोनी चेन्नईच्या डगआऊटमध्ये दिसण्याची शक्यता आहे.
