KKR vs SRH : रहाणेची टीम जिंकली असती, पण त्या 2 बॉलने गेम केला,KKR नेमकी मॅच कुठे हारली?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
हैदराबादने दिलेल्या 226 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकत्ताने आक्रामक सूरूवात केली होती.पॉवरप्लेमध्ये कोलकत्ताने 3 विकेट गमावून 74 धावा केल्या होत्या. त्यामुळे तुलनेत चांगली सूरूवात झाली होती.
advertisement
1/7

आयपीएलच्या आजच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने 65 धावांनी कोलकत्ता नाईट रायडर्सचा पराभव केला आहे. हैदराबादच्या विजयाचा शिल्पकार हा ईशान मलिंगा ठरला आहे.
advertisement
2/7
सनरायझर्स हैदराबादने दिलेल्या 226 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकत्ता नाईट रायडर्स 161 धावांवर ऑल आऊट झाली होती.त्यामुळे हैदराबादने हा सामना 65 धावांनी जिंकला आहे.
advertisement
3/7
हैदराबादने दिलेल्या 226 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकत्ताने आक्रामक सूरूवात केली होती.पॉवरप्लेमध्ये कोलकत्ताने 3 विकेट गमावून 74 धावा केल्या होत्या. त्यामुळे तुलनेत चांगली सूरूवात झाली होती.
advertisement
4/7
पण सामन्यात पुढे दोन बॉलने मोठा गेम केला. पॉवरप्लेच्या शेवटच्या बॉलवर मोठा ड्रामा झाला होता. ईशानने टाकलेल्या बॉलवर रघुवंशी स्ट्रेट ड्राईव्ह मारला होता,मात्र ईशाने तो पायाने अडवून रनआऊट केला होता. या दरम्यान ज्यावेळेस रनआऊट झाला तेव्हा दोन्ही खेळाडू एकमेकांच्या आजूबाजूला उभे ठाकले होते.पण अंपायरने कॅमरन ग्रीनला रनआऊट दिले होते.
advertisement
5/7
या रनआऊटनंतर 11 व्या ओव्हरला अंगक्रिश रघुवंशी रनआऊट झाला होता. खरं तर रिंकूने मारलेला बॉल खेळाडूच्या हातात गेला होता,त्यामुळे रन काढण्याची आवश्यकताच नव्हती.पण रघुवंशी घाईघाईत पळाला आणि रनआऊट होऊन बसला.
advertisement
6/7
रघुवंशी 29 बॉलमध्ये 52 धावा करून बाद झाला होता. जर तो मैदानात टीकता आला असता आणि त्याच्या सोबत कॅमरन ग्रीन देखील खेळला असता तर सामना नक्कीच अटीतटीचा झाला असता.
advertisement
7/7
या दोन रनआऊट नंतर रिंकूने 35 धावा करून सामना जिंकवण्याचा प्रयत्न केला पण तो देखील बाद झाला.रिंकू बाद होताच पाठोपाठ लाईन लागली आणि कोलकत्ता 161 वर ऑलआऊट झाली होती.त्यामुळे हैदराबादने हा सामना 65 धावांनी जिंकला होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
KKR vs SRH : रहाणेची टीम जिंकली असती, पण त्या 2 बॉलने गेम केला,KKR नेमकी मॅच कुठे हारली?