TRENDING:

Yamaha ने आणखी एक FZ Bike आणली, Bajaj Pulsar चा पडेल विसर, लूक आणि किंमत दमदार

Last Updated:
Yamaha FZ सीरिज ही लोकप्रिय ठरली. आता यामाहाने Yamaha FZ Rave नावाची नवीन बाईक लाँच केली आहे.
advertisement
1/8
Yamaha ने आणखी एक FZ Bike आणली, Bajaj Pulsar चा पडेल विसर, लूक आणि किंमत दमदार
जपानी वाहन उत्पादक कंपनी यामाहाने भारतात एकाच वेळी ३ नव्या बाईक लाँच केल्या आहे. मागील अनेक वर्षांपासून Yamaha Motor India ने भारतात 'FZ' फॅमिलीमध्ये वेगवेगळे प्रयोग केले. Yamaha FZ सीरिज ही लोकप्रिय ठरली. आता यामाहाने Yamaha FZ Rave नावाची नवीन बाईक लाँच केली आहे. या बाइकमध्ये बरेच बदल केले आहे. विशेष म्हणजे, या बाईकची किंमतही कमी ठेवली आहे. 
advertisement
2/8
यामाहा मोटर्सने भारतात FZ सीरिजमध्ये Yamaha FZ Rave नवीन मॉडेल आणलं आहे. हे आधीच्या FZ V4 सारखंच आहे. फक्त हेडलाईट आणि बाहेरील डिझाईनमध्ये बदल केले आहे. या बाईक किंमत  1.17 लाख (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरुवातीच्या किमतीत लाँच केली आहे. 
advertisement
3/8
Yamaha FZ Rave मध्ये विशेष म्हणजे, आक्रमक डिझाईनसह हेडलाइट वेगळा दिला आहे. यामाहा नेहमी आपल्या बाईकच्या हेडलाईटमध्ये वेगळेपण आणत असतं. आताही Yamaha FZ Rave चा हेडलाईट हा वेगळा आहे.
advertisement
4/8
Yamaha FZ Rave च्या दोन्ही बाजूंनी एअर व्हेंट्ससारखे दिसणारे डिझाईन असून एक एक दमदार इंधन टाकी दिली आहे. याशिवाय, बाईकला एक सिंगल-पीस सीट आणि मोटारसायकलच्या पुढील बाजूस अनेक पॅनेल्स आहेत. तसंच, Yamaha FZ Rave ला मॅट टायटन आणि मेटॅलिक ब्लॅक या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
advertisement
5/8
Yamaha FZ Rave बाईकमध्ये सर्व आवश्यक माहिती दर्शवणारे एक निगेटिव्ह एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील आहे.
advertisement
6/8
Yamaha FZ Rave ही  डायमंड  फ्रेमवर आधारित आहे.  ज्याला पुढील बाजूस टेलिस्कोपिक फोर्क आणि मागील बाजूस मोनोशॉक सस्पेंशन देण्यात आले आहे. मागे आणि पुढे सिंगल डिस्क ब्रेक लावले आहेत. 
advertisement
7/8
Yamaha FZ Rave मध्ये 17-इंचाचे व्हिल दिले आहे, ज्यात ट्यूबलेस टायर्स आहेत. पुढील बाजूस 100-सेक्शन टायर आहे, तर मागील बाजूस 140-सेक्शन युनिट आहे.
advertisement
8/8
Yamaha FZ Rave मध्ये 149 सीसी (cc) सिंगल-सिलेंडर एअर-कूल्ड इंजिन दिलं आहे, जे 7,250 rpm वर 12 hp पॉवर आणि 5,500 rpm वर 13.3 Nm चा पीक टॉर्क जनरेट करतो. या बाईकमध्ये  5-स्पीड ट्रान्समिशन गिअरबॉक्स दिला आहे. जे आधीच्या FZ सीरिजमध्ये आहे. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Yamaha ने आणखी एक FZ Bike आणली, Bajaj Pulsar चा पडेल विसर, लूक आणि किंमत दमदार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल