शिक्षक कन्येची सातासमुद्रपार भरारी, अमेरिकेत मिळालं साडेतीन कोटींचं पॅकेज
- Published by:News18 Marathi
Last Updated:
जालन्यातील जिल्हा परिषद शाळेत शिकलेली शीतल आता अमेरिकेत सीनियर सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करणार आहे.
advertisement
1/7

माहिती तंत्रज्ञानाच्या युगात संपूर्ण जग एक जागतिक खेड बनलं आहे. ज्यामुळे नवनवीन संधी, करिअरचे पर्याय तरुण-तरुणींना उपलब्ध होत आहेत. जालना शहरातील शीतल जुंबड या तरुणीला अमेरिकेमध्ये तब्बल साडेतीन कोटींचं पॅकेज मिळालं आहे.
advertisement
2/7
जालन्यातील जिल्हा परिषद शाळेत शिकलेली शीतल आता थेट अमेरिकेत सीनियर सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करणार आहे. पाहूयात शितल जुंबड या शिक्षक कन्येचा जालना टू अमेरिका हा प्रवास कसा झाला?
advertisement
3/7
जि. प. शाळेतील शिक्षक बाबासाहेब जुंबड यांची कन्या शीतल हिने कुटुंबीयच नव्हे तर जिल्ह्यात नोकरदारांच्या वेतनाचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. शीतलने इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण बालविकास प्राथमिक शाळा जालना, पाचवी सरस्वती भुवन हायस्कूल, तर इयत्ता 6 वी ते 10 वीचे शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय परतूर, 11 वी आणि 12 वी विश्वशांती ज्युनियर महाविद्यालय इंदेवाडी येथे पूर्ण केले.
advertisement
4/7
पुढे शीतलने बीटेक व्हीआयटी इंजिनिअरिंग कॉलेज पुणे येथून पूर्ण केले. त्यानंतर अमेरिकन कंपनीत स्थान मिळवले. विद्यापीठात मास्टर पदवीसाठी लागणाऱ्या जीआरई, टोफेल या दोन्ही परीक्षा पात्र केल्या.
advertisement
5/7
मुलीचा अभिमान असल्याचे बाबासाहेब जुंबड यांनी सांगितले. शीतलने असिस्टंट प्रोफेसर म्हणून जॉब करत मास्टर्स अमेरिकेत केले. यादरम्यानच ती पीजी कॉम्प्युटर करत होती. कॅलिफोर्निया येथे सीनियर सिस्टिम सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून ती नुकतीच जॉईन झालीय.
advertisement
6/7
मास्टर पदवी घेण्यासाठी गेलेल्या शीतलने जीआरई तसेच टोफेल अशा दोन्ही परीक्षा पात्र करून अमेरीकेच्या स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ युटाहमध्ये प्रवेश मिळवला. या उच्च पदवीच्या द्वितीय वर्षात असतानाच तिची सिस्टिम सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून निवड झाली. तिला यासाठी तब्बल 3 कोटी 60 लाखांचे पॅकेज मिळाले आहे.
advertisement
7/7
जालना ते थेट अमेरिका असा प्रवास करणारी शिक्षकाची मुलगी शीतल जुंबड मुलींसाठी रोल मॉडेल ठरली आहे. वडील शिक्षक आणि आई गृहिणी अशा जुंबड कुटुंबातील तिन्ही मुले सुशिक्षित आहेत. मुलगा व्हीआयटी पुणे येथे इंजिनिअरिंग करतो. तो बीटेक प्रथम वर्षात आहे तरे एक मुलगी एमबीबीएस द्वितीय वर्षात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/करिअर/
शिक्षक कन्येची सातासमुद्रपार भरारी, अमेरिकेत मिळालं साडेतीन कोटींचं पॅकेज