Most Difficult Exams : जगातल्या सर्वांत कठीण परीक्षा; एकातही यश मिळालं तरी लाईफ सेट!
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
आपला अभ्यास कठीण वाटत असेल, तर एकदा जगातल्या सर्वांत कठीण परीक्षांवर नक्की नजर टाकावी. त्यातल्या काही परीक्षा नऊ तास चालतात, तर काही परीक्षांमध्ये लाखो परीक्षार्थी सहभागी होतात. भारतातल्या तीन परीक्षांचाही त्यात समावेश होतो. त्यापैकी कोणतीही परीक्षा उत्तीर्ण झाल्यास जीवन उज्ज्वल होईल, यात काही शंका नाही.
advertisement
1/7

शाळेत असेपर्यंत विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षा सर्वांत कठीण वाटते. कॉलेजमध्ये गेल्यावर सीयूईटी, जेईई, नीट या परीक्षा कठीण वाटतात. सरकारी नोकरीसाठी यूपीएससी, एसएससी, गेट आदी परीक्षा देऊन स्वतःला सिद्ध करावं लागतं. जगातल्या सर्वांत कठीण परीक्षांमध्ये वेगवेगळ्या देशांतल्या 10 परीक्षांचा समावेश असून, त्यात भारतातल्या तीन परीक्षांचा समावेश आहे.
advertisement
2/7
Gaokao Exam : गौका परीक्षा चीनमध्ये होते. या परीक्षेला जगातल्या सर्वांत कठीण परीक्षेचा दर्जा मिळाला आहे. चिनी भाषेत या शब्दाचा अर्थ होतो हाय एक्झाम. चिनी युनिव्हर्सिटीत प्रवेश घेण्यासाठी Gaokao Exam पास होणं अनिवार्य आहे. दर वर्षी एक कोटीहून अधिक चिनी विद्यार्थी ही परीक्षा देतात. 9 तास चालणारी ही परीक्षा जून महिन्यात होते.
advertisement
3/7
IIT JEE Exam : आयआयटीमध्ये प्रवेश मिळवणं खूप कठीण असतं. त्यासाठी सर्वांत कठीण परीक्षेच्या यादीत असलेली जेईई परीक्षा पास करावी लागते. दर वर्षी लाखो तरुण आयआयटी जेईई परीक्षा देतात. ही परीक्षा दोन टप्प्यांत होते - जेईई मेन आणि जेईई अॅडव्हान्स्ड. दोन्ही परीक्षांची कटऑफ लिस्ट खूप उच्च असते. जेईई मेन परीक्षेत पास झालेल्या टॉप अडीच लाख विद्यार्थ्यांना जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा देता येते. जेईई परीक्षा 12वी पास विद्यार्थ्यांसाठी असते. ही परीक्षा 3 तास चालते.
advertisement
4/7
UPSC Exam : दर वर्षी 20 लाखांहून अधिक तरुण यूपीएससी सिव्हिल सेवा परीक्षा देतात. तिचा समावेश जगातल्या सर्वांत कठीण परीक्षांच्या यादीत करण्यात आला आहे. यूपीएससी परीक्षा पास झाल्यावर देशात सर्वांत प्रतिष्ठित असलेली सरकारी नोकरी मिळवता येते. यूपीएससी परीक्षा देण्यासाठी ग्रॅज्युएट असणं अनिवार्य आहे. आयएएस, आयपीएस, आयआरएस यांसारख्या पदांवर नोकरी करण्यासाठी यूपीएससी परीक्षेच्या टॉप मेरिट लिस्टमध्ये नाव येणं गरजेचं असतं. या परीक्षेचा सक्सेस रेट 0.1%-0.3% एवढा कमी आहे.
advertisement
5/7
Mensa IQ Test : मेन्सा आयक्यू टेस्ट जगप्रसिद्ध आहे. त्या माध्यमातून माणसांचा आयक्यू तपासला जातो. मेन्सा ही एक ग्लोबल सोसायटी आहे. मेन्सा आयक्यू टेस्टमध्ये 98 परसेंटाइल किंवा त्यापेक्षा जास्त स्कोअर असलेल्या व्यक्तीच त्यात सहभागी होऊ शकतात. मेन्सा सोसायटीत सहभागी होण्यासाठी किमान वयाची मर्यादा नाही. या सोसायटीचा सर्वांत लहान वयाचा सदस्य केवळ 2 वर्षांचा आहे. ही परीक्षे 1-2 तासांची असते.
advertisement
6/7
GRE Exam : यूएसए आणि कॅनडातल्या बहुतांश ग्रॅज्युएट स्कूल्समध्ये प्रवेश घेण्यासाठी जीआरई परीक्षा देणं आवश्यक असतं. या परीक्षेची सुरुवात 87 वर्षांपूर्वी, 1936 साली झाली. 3 तास 45 मिनिटांच्या या परीक्षेत प्रत्येक सेक्शननंतर 1 मिनिटाचा आणि तिसऱ्या सेक्शननंतर 10 मिनिटांचा ब्रेक मिळतो. या परीक्षेच्या स्कोअरनुसार विविध युनिव्हर्सिटीजच्या मास्टर्स आणि डॉक्टरल प्रोग्राममध्ये प्रवेश मिळतो. 2021-22 च्या शैक्षणिक सत्रात 3 लाखांहून अधिक उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती.
advertisement
7/7
GATE Exam : गेट परीक्षेचं आयोजन भारतात केलं जातं. ही जगातली 8वी सर्वांत कठीण परीक्षा आहे. 3 तासांच्या या परिक्षेतला सक्सेस रेट 18% आहे. जगातल्या सर्वांत कठीण परीक्षांच्या यादीत सहाव्या नंबरवर CFA एक्झाम (4.5 तास), 7व्या नंबरवर CCIE परीक्षा (2 तास), 9व्या नंबरवर UMSLE परीक्षा (8 तास) आणि 10व्या नंबरवर कॅलिफोर्निया बार एक्झाम (4 तास) आहे. या सर्व परीक्षांच्या तयारीसाठीच उमेदवारांना अनेक वर्षांचा वेळ द्यावा लागतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/करिअर/
Most Difficult Exams : जगातल्या सर्वांत कठीण परीक्षा; एकातही यश मिळालं तरी लाईफ सेट!