निकिताला अमेरिकेत संपवलं आणि अर्जुन भारतात पळून आला; एक्सच्या घरात सापडला मृतदेह
- Published by:Priya Lad
Last Updated:
Indian Woman Murder In America By Ex-Boyfriend : 27 वर्षांची निकिता 31 डिसेंबरच्या संध्याकाळनंतर बेपत्ता असल्याची तक्रार 26 वर्षीय अर्जुनने पोलिसात दाखल केली होती.
advertisement
1/5

अमेरिकेत एका भारतीय तरुणीच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. निकिता गोडिशाला असं या तरुणीचं नाव आहे. 27 वर्षांची निकिता गोडिशला हिचा मृतदेह तिच्या एक्स-बॉयफ्रेंडच्या घरातच सापडला आहे. एक्स बॉयफ्रेंड अर्जुन शर्मा भारतात पळाला आहे. पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासा झाला आहे.
advertisement
2/5
26 वर्षीय अर्जुनने 2 जानेवारी 2026 रोजी त्याची एक्स गर्लफ्रेंड निकिता बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दाखल केली. निकिता एलिकॉट सिटीमध्ये डेटा आणि स्ट्रॅटेजी विश्लेषक म्हणून काम करत होती. अर्जुनने पोलिसांना सांगितलं की त्याने निकिताला शेवटचं 31 डिसेंबर 2025 रोजी त्याच्या मेरिलँड येथील कोलंबियामधील अपार्टमेंटमध्ये पाहिलं होतं.
advertisement
3/5
3 जानेवारी 2026 रोजी हॉवर्ड काउंटी पोलीस अर्जुनच्या अपार्टमेंटमध्ये चौकशीसाठी पोहोचलं. शोधमोहीम दरम्यान पोलिसांना निकिताचा मृतदेह आढळला. तिच्या शरीरात चाकू खुपसलेला होता. पोलिसांच्या अहवालानुसार निकिताची चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती.
advertisement
4/5
अर्जुननेच निकिताची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. 31 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजल्यानंतर अर्जुनने निकिताची हत्या केल्याचं तपास अधिकाऱ्यांचं मत आहे. तक्रार दाखल करणं ही त्याची एक युक्ती होती, त्यानंतर काही तासांतच तो देश सोडून भारतात पळून गेला आहे. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
advertisement
5/5
या गुन्ह्याचा शोध लागल्यानंतर अमेरिकन पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे. अर्जुनविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. तो भारतात पळाल्यामुळे अमेरिकन पोलीस आता त्याला पकडण्यासाठी फेडरल एजन्सीसोबत काम करत आहेत. अमेरिकेतील भारतीय दूतावासानेही या घटनेची माहिती दिली आणि पीडितेच्या कुटुंबाच्या संपर्कात असल्याचं सांगितलं. दूतावास स्थानिक अधिकाऱ्यांकडेही या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहे. (सर्व फोटो : सोशल मीडिया)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/क्राइम/
निकिताला अमेरिकेत संपवलं आणि अर्जुन भारतात पळून आला; एक्सच्या घरात सापडला मृतदेह