8 वर्षांपूर्वीचा ब्लॉकबस्टर सिनेमा, आता Netflix वरुन होणार गायब; बॉक्स ऑफिसवर घातलेला धुमाकूळ
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Netflix Movie: भारतीय सिनेमाच्या इतिहासात असे काही सिनेमे आहेत ज्यांनी ब्लॉकबस्टर ठरत अनेक रेकॉर्ड मोडले. असाच एक सिनेमा जो 8 वर्षांपूर्वी आला. ज्याने बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड मोडत ब्लॉकबस्टरचा टप्पा गाठला. मात्र हा सिनेमा आता ओटीटीवर हटवण्यात येणार आहे.
advertisement
1/7

भारतीय सिनेमाच्या इतिहासात असे काही सिनेमे आहेत ज्यांनी ब्लॉकबस्टर ठरत अनेक रेकॉर्ड मोडले. असाच एक सिनेमा जो 8 वर्षांपूर्वी आला. ज्याने बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड मोडत ब्लॉकबस्टरचा टप्पा गाठला. मात्र हा सिनेमा आता ओटीटीवर हटवण्यात येणार आहे.
advertisement
2/7
आपण बोलत असलेला हा ब्लॉकबस्टर सिनेमा दुसरा तिसरा कोणता नसून "बाहुबली 2: द कन्क्लुजन" आहे. 28 एप्रिल 2017 रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. प्रेक्षकांना हा सिनेमा खूपच आवडला.
advertisement
3/7
एस.एस. राजामौली दिग्दर्शित या चित्रपटात प्रभासने अमरेंद्र आणि महेंद्र बाहुबली अशा दुहेरी भूमिका केल्या होत्या. त्याच्यासोबत राणा दग्गुबती, अनुष्का शेट्टी, तमन्ना भाटिया, राम्या कृष्णन, सत्यराज आणि नस्सर यांसारखे दिग्गज कलाकार होते.
advertisement
4/7
हा चित्रपट “बाहुबली: द बिगिनिंग” (2015) चा सिक्वेल होता आणि त्याच कहाणीचा पुढचा भाग सांगणारा होता. कथेत महिष्मती साम्राज्यातील सत्तेसाठी संघर्ष दाखवला गेला आहे. अमरेंद्र बाहुबली आणि भल्लालदेव यांच्यातील वैर, कटप्पाने अमरेंद्रला मारण्यामागील कारण आणि त्यानंतर मुलगा महेंद्र बाहुबलीने वडिलांचा बदला घेतल्याची कहाणी प्रेक्षकांच्या मनाला भिडली. यात प्रेम, मैत्री, विश्वासघात, सूड आणि न्याय यांचा सुंदर संगम दिसतो.
advertisement
5/7
या चित्रपटाने प्रदर्शित होताच अनेक विक्रम मोडले. त्यावेळी तो भारतातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. या सिनेमाने जगभरात 1810.60 कोटींची कमाई केली होती. या सिनेमाचं बजेट 250 कोटी होतं मात्र कमाई त्याच्यापेक्षा अनेक पटीने जास्त झाली.
advertisement
6/7
रिलीजनंतर हा चित्रपट नेटफ्लिक्सवरही उपलब्ध करण्यात आला आणि तेथेही तो मोठ्या प्रमाणात पाहिला गेला. बराच काळ तो ट्रेंडिंग लिस्टमध्ये होता आणि ओटीटीवरील सर्वाधिक पाहिला गेलेला भारतीय चित्रपट बनला.
advertisement
7/7
मात्र, ताज्या माहितीनुसार, 30 सप्टेंबर 2025 पासून “बाहुबली 2: द कन्क्लुजन” नेटफ्लिक्सवरून काढला जाणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना तो पाहण्यासाठी आता फक्त काहीच दिवस शिल्लक आहेत. नेटफ्लिक्सच्या 'Leaving Soon' सेक्शनमध्ये याची घोषणा करण्यात आली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
8 वर्षांपूर्वीचा ब्लॉकबस्टर सिनेमा, आता Netflix वरुन होणार गायब; बॉक्स ऑफिसवर घातलेला धुमाकूळ