उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस प्रवेशासाठी जाण्यापूर्वी त्याने आपले जीवन संपविले. मृतक अनुराग बोरकर याने नीट यूजी २०२५ परीक्षेत ९९.९९ टक्के गुण मिळवून ओबीसी प्रवर्गातून १४७५ वी रँक पटकाविली होती.
आत्महत्येच्या ठिकाणी अनुरागने सुसाईड नोटही लिहून ठेवली होती. यामध्ये मला डॉक्टर व्हायचे नाहीये, असे त्याने लिहिले होते. अभ्यासाचा दबाव आणि भीती यामुळे त्याने जीवन संपविण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते.
advertisement
निकालानंतर अनुरागच्या यशाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते. त्याचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार होते. मात्र त्याच्या आत्महत्येने हे स्वप्न अपूर्णच राहिले आहे. त्याला आज एमबीबीएस प्रवेशासाठी गोरखपूर येथे जायचे होते. परंतु राहते घरीच त्याने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास नवरगाव पोलीस करीत आहे. पोलिसांनी याप्रकरणी एक सुसाईड नोट मिळाल्याची माहिती दिली आहे.