राज कपूर -दिलीप कुमारचे चौकार, वहिदा रहमानच्या सर्वाधिक रन्स! मुंबईत रंगलेल्या सामन्याची गोष्ट माहित आहे का?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Raj Kapoor Dilip Kumar Cricket Match Mumbai : राज कपूर आणि दिलीप कुमार हे एकमेकांचे जिवलग मित्र होते. हे दोन मित्र जेव्हा क्रिकेटच्या मैदानावर एकमेकांसमोर आले होते... मुंबईत रंगलेल्या या क्रिकेट सामन्याची गोष्ट माहितीये!
advertisement
1/10

बॉलिवूडचे शो मॅन म्हणजे राज कपूर आणि ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांना केवळ चित्रपटसृष्टीच नव्हे तर क्रिकेटचीही आवड होती. संधी मिळताच ते क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात जायचे.
advertisement
2/10
28 जानेवारी 1962 साली मुंबईतील शिवाजी महाराज पार्क येथे एक संस्मरणीय क्रिकेट सामना रंगला होता.
advertisement
3/10
दिलीप कुमार आणि राज कपूर यांच्या संघांनी एका मैत्रीपूर्ण सामन्यात एकमेकांना तगडी फाइट दिली आहे.
advertisement
4/10
महत्त्वाचं म्हणजे दिलीप कुमार आणि राज कपूर यांच्यात अभिनेत्री वहिदा रहमान यांनी बाजी मारली होती.
advertisement
5/10
दिलीप कुमार आणि राज कपूर यांच्यात खोल मैत्री होती. दोघांनीही त्यांचे बालपण पेशावरमध्ये घालवले. मुंबईत येऊन दिलीप कुमार सुपरस्टार झाल्यानंतरही ही मैत्री कायम राहिली.
advertisement
6/10
1962 साली झालेली ही एक चॅरिटी मॅच होती जो फिल्म इंडस्ट्रीतील कामगारांसाठी निधी जमा करण्याच्या उद्देशाने खेळवला गेला होता.
advertisement
7/10
या सामन्यात शम्मी कपूर, शशि कपूर, महमूद, प्रेमनाथ, जॉय मुखर्जी, जॉनी वॉकर, जबिन जलील, शुभा खोटे, मनोज कुमार, राजेंद्र कुमार, नंदा आणि राजकुमार यांसारख्या कलाकारांनी भाग घेतला होता.
advertisement
8/10
या सामन्याची कॉमेन्ट्री राज मेहरा यांनी केली होती. हा सामना राज कपूर यांची टीम जिंकली होती.
advertisement
9/10
दिलीप कुमार यांच्या टीमकडून वहीदा रहमान यांनी आणि राज कपूर यांच्या टीमकडून शम्मी कपूर हिनं सर्वाधिक धावा केल्या होत्या.
advertisement
10/10
असं म्हणतात की राज कपूर यांच्या बॉलवर दिलीप कुमार यांनी चौकार लगावले होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
राज कपूर -दिलीप कुमारचे चौकार, वहिदा रहमानच्या सर्वाधिक रन्स! मुंबईत रंगलेल्या सामन्याची गोष्ट माहित आहे का?