80s मधला तो बालकलाकार, लीड अभिनेत्यांपेक्षा होता मोठा स्टार; आता अभिनय सोडून करतोय हे काम
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
80s Child Artist : 80s मध्ये असा एक बालकलाकार होता ज्याने बॉलिवूडवरती राज्य केले होते. आता तो नेमका काय करतो हा त्याच्या चाहत्यांना पडलेला प्रश्न आहे.
advertisement
1/7

बॉलिवूडमध्ये 80s च्या दशकात बालकलाकारही स्टार्स होते. बॉलिवूडमध्ये 80s च्या दशकातील काही बालकलाकार होते जे त्याकाळातील सुपरस्टार्स अभिनेत्यांना टक्कर द्यायचे. ते खूपच प्रसिद्ध झाले होते.
advertisement
2/7
बॉलिवूडमध्ये एक असा बालकलाकार होता त्याने खूप प्रसिद्धी मिळवली होती. त्या बालकलाकाराला मास्टर बिट्टू नावाने ओळखले जायचे.
advertisement
3/7
त्याच्या दमदार अभिनयाने, संवाद फेक आणि चेहऱ्याचे वेगवेगळे हावभाव यामुळे तो प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस पडायचा. पण तो नेमका आता कुठे गायब झाला ? आता तो काय करतो ? हा सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे.
advertisement
4/7
आपल्या चेहऱ्याच्या हावभावाने , अभिनयाने, 70 आणि 80 च्या दशकात आपला ठसा उमटवला, ज्या बालकलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. तो आता अभिनय क्षेत्रात काम करत नाही. त्याचे खरे नाव होते विशाल देसाई.
advertisement
5/7
तो मुंबईमध्ये राहतो. त्याने महाभारताचे दिग्दर्शक बी. आर. चोपडा यांच्या प्रोडक्शन हाउस सोबत पडद्यामागे काम केले होते. त्याने बागबान, भूतनाथ आणि इतर चित्रपटांसाठी पडद्यामागे काम केले. ढोलकी सिनेमाला त्याने दिग्दर्शकाचे काम केले होते.
advertisement
6/7
तो आता निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून आपले योगदान देत आहे. सोबतच तो वेगवेगळे टिव्ही शो आणि चित्रपट तयार करतो. पण तो सध्या या लाइमलाइट पासून लांब राहायचा प्रयत्न करत आहे.
advertisement
7/7
मास्टर बिट्टूलाचे अनेक चित्रपट गाजले होते. अभिनेत्री शबाना आजमी यांच्या अनोखा बंधन चित्रपटात त्याने आपल्या भावनिक संवादाने प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणले होते. त्याने अमर अकबर एंथनी, याराना, अनोखा बंधन, अपनापन, रुस्तम, दो और दो पाच, चुपके चुपके, गृह प्रवेश या प्रसिध्द चित्रपटात काम केले होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
80s मधला तो बालकलाकार, लीड अभिनेत्यांपेक्षा होता मोठा स्टार; आता अभिनय सोडून करतोय हे काम