TRENDING:

Rajpal Yadav: 9 कोटींच्या कर्जाची टांगती तलवार, तिहार जेलमध्ये शिक्षा भोगता-भोगता राजपाल यादव लखपती! मिळाली मोठी ऑफर

Last Updated:
Rajpal Yadav Controversy: आता मनोरंजन विश्वातील एक मोठा ब्रँड राजपाल यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला असून, त्यांना एका मोठ्या प्रोजेक्टची ऑफर दिली आहे.
advertisement
1/9
तिहार जेलमध्ये शिक्षा भोगता-भोगता राजपाल यादव लखपती! मिळाली मोठी ऑफर
बॉलिवूड अभिनेते राजपाल यादव सध्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंगाला सामोरं जात आहेत. ९ कोटींच्या जुन्या कर्ज प्रकरणापायी त्यांना दिल्लीच्या तिहार जेलची हवा खावी लागतेय.
advertisement
2/9
"माझ्याकडे आता द्यायला एक रुपयाही उरलेला नाही," असं म्हणत हताश झालेल्या राजपाल यांच्यासाठी आधी सलमान खान, अजय देवगण आणि सोनू सूद मदतीला धावले होते.
advertisement
3/9
पण आता मनोरंजन विश्वातील एक मोठा ब्रँड राजपाल यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला असून, त्यांना एका मोठ्या प्रोजेक्टची ऑफर दिली आहे.
advertisement
4/9
'पंचायत', 'गुल्लक' आणि 'ये मेरी फॅमिली' सारख्या गाजलेल्या वेब सीरिज बनवणारी 'द वायरल फीवर' (TVF) ही कंपनी आता राजपाल यांच्या मदतीसाठी पुढे आली आहे.
advertisement
5/9
TVF ने सोशल मीडियावर एक अत्यंत भावनिक पोस्ट शेअर करत राजपाल यादव यांना पाठिंबा जाहीर केला आहे. केवळ पाठिंबाच नाही, तर राजपाल यांच्यासोबत एक खास वेब सीरिज करण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे.
advertisement
6/9
TVF ने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय, "या कठीण काळात आम्ही राजपाल यादव जी यांच्यासोबत मजबुतीने उभे आहोत. राजपालजी, तुमच्या अभिनयाने अनेक दशकांपासून करोडो लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणलं आहे. आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि आम्हाला तुमच्यासोबत काहीतरी खास बनवायला नक्कीच आवडेल. एक अशी सीरिज, जिथे प्रेक्षक तुमची ती जुनी जादू पुन्हा एकदा जवळून अनुभवू शकतील."
advertisement
7/9
२०१२ साली स्वतःचं दिग्दर्शन असलेल्या 'अता पता लापता' या सिनेमासाठी राजपाल यादव यांनी ५ कोटी रुपये कर्ज घेतलं होतं. दुर्दैवाने सिनेमा फ्लॉप झाला आणि कर्जाचं चक्र असं काही फिरलं की व्याजासह ही रक्कम ९ कोटींच्या घरात गेली.
advertisement
8/9
पैशांची तजवीज न होऊ शकल्याने राजपाल यांना कोर्टाच्या आदेशानुसार सरेंडर करावं लागलं. सध्या ते तिहार जेलमध्ये असले, तरी बाहेरून मिळणारी ही मदत त्यांच्यासाठी आशेचा किरण ठरत आहे. राजपाल यांच्यासाठी सोनू सूदने सर्वात आधी आपल्या आगामी चित्रपटाचा साइनिंग बोनस दिला होता.
advertisement
9/9
त्यानंतर आता TVF सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मने त्यांना वेब सीरिज ऑफर केल्यामुळे राजपाल यादव जेलमधून बाहेर आल्यावर त्यांच्याकडे कामाचा ओघ असेल, हे स्पष्ट झालंय. या कामातून मिळणाऱ्या पैशांतून ते आपलं कर्ज फेडू शकतील, असा विश्वास चाहत्यांना वाटत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rajpal Yadav: 9 कोटींच्या कर्जाची टांगती तलवार, तिहार जेलमध्ये शिक्षा भोगता-भोगता राजपाल यादव लखपती! मिळाली मोठी ऑफर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल