'प्रेमाशिवाय सर्व काही...' एकीकडे विजयसोबत अफेअरच्या चर्चा, दुसरीकडे प्रेमाबद्दल हे काय म्हणाली तृषा कृष्णन?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Thalapathy Vijay-Trisha Krishnan: थलापती विजयच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ आलं असतानाच, तृषाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टने या आगीत तेल ओतण्याचं काम केलं आहे.
advertisement
1/6

गेल्या काही दिवसांपूर्वी साऊथ इंडस्ट्री एका धमाक्यामुळे हादरली होती. साऊथचा सुपरस्टार थलापती विजयवर त्याची पत्नी संगीताने फसवणुकीचे आरोप करत घटस्फोटासाठी अर्ज केला. तब्बल २५ वर्षांचा संसार आता आता संपुष्टात आला आहे.
advertisement
2/6
संगीताने विजयचे एका सह-अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचे आरोप केले होते. अशातच संगीताने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याच्या काही दिवसांनी विजय आणि अभिनेत्री तृषा कृष्णन यांनी एकत्र एका सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यानंतर त्यांच्या अफेअरच्या बातम्यांना पुन्हा एकदा उधाण आलं होतं.
advertisement
3/6
दरम्यान, एकीकडे विजयच्या वैयक्तिक आयुष्यात वादळ आलं असतानाच, तृषाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टने या आगीत तेल ओतण्याचं काम केलं आहे. "शांतता ही बरोबर असण्यापेक्षा जास्त मौल्यवान आहे," असं म्हणत तृषाने नेमकं कोणाकडे बोट दाखवलंय, यावर आता सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.
advertisement
4/6
रविवारी तृषाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यात लिहिलं होतं, "मी आयुष्याच्या अशा वळणावर आहे जिथे मला आता कोणाशीच वाद घालायचा नाही. जर तुम्ही म्हणालात की हत्ती उडू शकतो, तर तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे! कारण मला आता कोणाला पटवून देण्यात माझी ऊर्जा वाया घालवायची नाही. शांत राहणं हे बरोबर असण्यापेक्षा महत्त्वाचं आहे."
advertisement
5/6
यासोबतच तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यात लिहिलंय, "प्रेम हेच सर्वकाही नाही आणि तरीही प्रेमाशिवाय सर्व काही अर्थहीन आहे." या फोटोवर तिने 'Fact' असं म्हटलंय. आता या पोस्टचा इशारा कोणाकडे आहे, हे चाहत्यांना अद्याप समजलेलं नाही.
advertisement
6/6
'घिल्ली' पासून 'लिओ' पर्यंत विजय आणि तृषा यांच्या जोडीने बॉक्स ऑफिस गाजवला. पण आता ही केमिस्ट्री केवळ पडद्यापुरती मर्यादित राहिलेली नाही, अशा चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, तामिळ राजकारणात पाऊल ठेवलेल्या विजयसाठी हा वाद त्याच्या प्रतिमेवर काय परिणाम करतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'प्रेमाशिवाय सर्व काही...' एकीकडे विजयसोबत अफेअरच्या चर्चा, दुसरीकडे प्रेमाबद्दल हे काय म्हणाली तृषा कृष्णन?