Nandita Patkar : शेवंतानंतर नंदिता पाटकरचं गुपचूप दुसरं लग्न! कोण आहे अभिनेत्रीचा नवरा? इंडस्ट्रीशी खास कनेक्शन
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Who is Nandita Patkar Second Husband : अभिनेत्री नंदिता पाटकर हिने दुसरं लग्न केलं. कोण आहे तिचा दुसरा नवरा? करतो काय?
advertisement
1/8

'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री नंदिता पाटकर. काही महिन्यांआधीच तिने एका मुलाखतीत बोलताना तिचा डिवोर्स झाल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आता काही महिन्यातच नंदिता पाटकर हिनं दुसरं लग्न केलं आहे.
advertisement
2/8
नंदिताच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नंदिताचा दुसरा नवरा कोण आहे हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते आतूर आहेत.
advertisement
3/8
नंदिता पाटकर हिनं नुकतंच कोर्ट मॅरेज केलं आहे. विपुल महागावकर असं तिच्या नवऱ्याचं नाव आहे. तो नाट्य दिग्दर्शक आहे. दोघांनी एकत्र एका नाटकात देखील काम केलं आहे. नुकतंच दोघांनी कोर्ट मॅरेज करत त्यांच्या नात्याची नवीन सुरुवात केली आहे.
advertisement
4/8
विपुल हा सध्याचा मराठीतील तरुण आणि अभ्यासू दिग्दर्शकांपैकी एक आहे. 'पै पैशाची गोष्ट', 'उध्वस्त धर्मशाळा' सारख्या नाटकांमध्ये त्याला ओळख मिळाली.
advertisement
5/8
नंदिताचा नवरा विपुल महागावकर सोशल मीडियावर देखील खूप सक्रीय आहे. त्याचं सोशल मिडिया अकाऊंट चेक केलं असता त्याने स्वत: ची ओळख थिएटर डायरेक्टर, डॉक्युमेंट्री फिल्ममेकर आणि थिएटर क्युरेटर अशी करून दिली आहे.
advertisement
6/8
अभिनेत्री नंदिता पाटकरविषयी सांगायचं झाल्यास, नंदिता स्टार प्रवाहवरील 'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेत काम करत होती. त्याआधी 2014 साली आलेल्या 'एलिझाबेथ एकादशी' या सिनेमात तिनं काम केलं होतं. तिच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं होतं. तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले होते.
advertisement
7/8
त्याचप्रमाणे तिने आतापर्यंत 'खारी बिस्किट', 'बाबा', 'पाणी' सारख्या अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. नंदिता सध्या 'शेवग्याच्या शेंगा' या मराठी नाटकात काम करतेय.
advertisement
8/8
काही महिन्यांआधी दिलेल्या मुलाखतीत नंदिताने तिच्या डिवोर्सवर भाष्य केलं होतं. घटस्फोट हा शब्द मला अस्वस्थ करतो असं ती म्हणाली होती. नंदिताचं लग्न फार काळ टिकू शकलं नाही. लग्नानंतर काही काळातच ती नवऱ्यापासून वेगळी झाली. त्यानंतर आता अनेक वर्षांनी पुन्हा लग्न करत नव्या आयुष्याची सुरूवात केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Nandita Patkar : शेवंतानंतर नंदिता पाटकरचं गुपचूप दुसरं लग्न! कोण आहे अभिनेत्रीचा नवरा? इंडस्ट्रीशी खास कनेक्शन