"माझ्याबरोबर ते कधीच रोमँटिक नव्हते"; अमिताभसोबतच्या नात्यावर जया बच्चन यांचा खुलासा
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Jaya Bachchan and Amitabh Bachchan Love Story : अभिनेत्री जया बच्चन आणि अमिताभ बच्चन हे बॉलिवूडमधील दोन सुपरस्टार. दोघांनी कुटुंबाच्या संमतीनं लव्ह मॅरेज केलं. पण अमिताभ माझ्याबरोबर कधीच रोमँटिक नव्हते असा खुलासा जया बच्चन यांनी एका मुलाखतीत केला होता.
advertisement
1/6

जया बच्चन या सिमी गरेवाल हिच्या मुलाखतीत बोलताना दोघांच्या नात्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला होता. सिमी गरेवाल हिनं अमिताभ यांना प्रश्न विचारला की, तुम्ही स्वत:ला रोमँटिक समजता?
advertisement
2/6
यावर उत्तर देत अमिताभ पटकन म्हणाले, "नाही". त्यांच्या बाजूला बसलेल्या जया बच्चन देखील हसत हसत म्हणाल्या, "नाही माझ्याबरोबर तर नाही". जया यांच्या या कमेंटनं अमिताभ बच्चन आश्चर्यानं त्यांच्याकडे पाहू लागले.
advertisement
3/6
पुढे सिमीनं अमिताभ यांना विचारलं की, रोमँटिक होण्याचा अर्थ काय? त्यावर जया बच्चन म्हणाल्या, "आपल्या पार्टनरसाठी वाइन आणि फूल आणण्यासारख्या कृती करणं".
advertisement
4/6
अमिताभ यांनी जया यांची ही व्याख्या लगेच मोडीत काढत, "मी असं कधीही केलेलं नाही", असं म्हणतात. पुढे जया बच्चन म्हणाल्या, "जर अमिताभची कोणी गर्लफ्रेंड असती तर रोमँटिक असते. त्यांनी तसं केलं पण मला अजूनही तसं वाटत नाही".
advertisement
5/6
सिमीनं जया बच्चन यांना विचारलं, "तुम्ही डेटिंग करत होता तेव्हा अमिताभ रोमँटिक झाले होते?" जया बच्चन म्हणाल्या, "आम्ही कधी बोललोच नाही. कधीतरी आम्ही बोललो असू". यावर अमिताभ म्हणाले, "यह समय की बहुत बर्बादी है".
advertisement
6/6
जया बच्चन यांनी सांगितलं, "मी पहिल्यांदा अमिताभ यांचा भेटले जेव्हा मला भिती वाटत होती, मी घाबरले होते. कारण अमिताभ हे एकमेव माणूस होते ज्यांचा माझ्यावर प्रभाव पडत होता. जे इतर कोणालाही जमलं नाही".
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
"माझ्याबरोबर ते कधीच रोमँटिक नव्हते"; अमिताभसोबतच्या नात्यावर जया बच्चन यांचा खुलासा