अमिताभ बच्चन यांनी प्रसिद्ध अभिनेत्रीला रडवलं, KBC 17 च्या सेटवरील तो व्हिडीओ व्हायरल
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी एका प्रसिद्ध अभिनेत्रीला रडवलं आहे. KBC 17 च्या सेटवरील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
1/7

अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती 17' या कार्यक्रमात अनन्या पांडे आणि कार्तिक आर्यन सहभागी झाले होते. आपल्या आगामी 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान अनन्या पांडेने आपले काही अनुभवदेखील शेअर केले. तसेच KBC 17 च्या हॉट सीटवर बसलेल्या अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेदेखील दिली.
advertisement
2/7
'कौन बनेगा करोडपती 17'च्या मंचावर भावूक झालेली अनन्या पांडे पाहायला मिळाली. अमिताभ बच्चन असं काही बोलून गेले की अनन्या पांडेला अश्रू अनावर झाले. अनन्या पांडेने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.
advertisement
3/7
अनन्या पांडे 'केबीसी 17'च्या मंचावर 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आली होती. पण अमिताभ बच्चन मात्र अनन्याचं तिच्या मागच्या 'केसरी चॅप्टर 2' या फिल्ममधील तिच्या अभिनयाचं कौतुक करताना दिसून आले. बिग बींचं कौतुक पाहून अनन्या पांडे भावूक झाली होती.
advertisement
4/7
अनन्या पांडेने 'केसरी चॅप्टर 2' या फिल्ममध्ये दिलरीत गिल हे पात्र साकारलं होतं. या फिल्ममध्ये अक्षय कुमार आणि आर माधवन हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते.
advertisement
5/7
केबीसीच्या मंचावर अमिताभ बच्चन अनन्या पांडेचं कौतुक करत म्हणाले,"अनन्याची 'केसरी चॅप्टर 2' ही फिल्म आहे. या फिल्ममध्ये अनेक कलाकार दिग्गज कलाकार आहेत. या फिल्ममध्ये सर्वच कलाकारांनी उत्तम काम केलं आहे. दिग्गज कलाकार असूनही अनन्या पांडे आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडते".
advertisement
6/7
अमिताभ पुढे म्हणालेले,"अनन्याचे जास्त संवाद नव्हते. प्रेक्षकांपर्यंत ती गोष्ट पोहोचवण्याचं काम खूप महत्त्वाचं असतं. ही गोष्ट खूप कमी कलाकारांना जमते. पण अनन्यामध्ये मला ही गोष्ट जाणवली होती". अमिताभ बच्चन यांचं अशाप्रकारे कौतुक ऐकून भावूक झालेली अनन्या पांडे पाहायला मिळाली.
advertisement
7/7
कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे यांचा 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' हा रोमँटिक-कॉमेडी सिनेमा प्रेक्षकांना 25 डिसेंबरपासून थिएटरमध्ये पाहता येणार आहे. 150 कोटींच्या बजेटमध्ये निर्मिती करण्यात आलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार हे पाहावे लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
अमिताभ बच्चन यांनी प्रसिद्ध अभिनेत्रीला रडवलं, KBC 17 च्या सेटवरील तो व्हिडीओ व्हायरल