TRENDING:

7 एपिसोडची ही स्पाय-थ्रिलर सीरिज, रिलीजच्या एक महिन्यानंतरही Prime Video वर करतेय ट्रेंड

Last Updated:
Prime Video Must Watched Web Series : प्राईम व्हिडीओ या OTT प्लॅटफॉर्मवरील एक स्पाय थ्रिलर सीरिज सध्या ट्रेंड करत आहे.
advertisement
1/7
7 एपिसोडची ही स्पाय-थ्रिलर सीरिज, Prime Video वर करतेय ट्रेंड
OTT प्लॅटफॉर्मवर प्रत्येक आठवड्याला नवीन फिल्म आणि सीरिज रिलीज होतात. यात मिस्ट्री, थ्रिलर, रोमान्स, ड्रामा अशा वेगवेगळ्या जॉनरचा समावेश असतो. पण प्राईम व्हिडीओ (Prime Video) या प्लॅटफॉर्मवरील एक सीरिज प्रेक्षकांना घरबसल्या संपूर्ण कुटुंबासोबत पाहता येईल.
advertisement
2/7
प्राईम व्हिडीओने 'TOP 10' ट्रेडिंग वेबसीरिजची यादी जाहीर केली असून यात ही सीरिज ट्रेंड करत आहे. प्राईम व्हिडीओवरील ही स्पाय-थ्रिलर सीरिज आहे.
advertisement
3/7
प्राईम व्हिडीओवर सध्या ट्रेंड करत असलेल्या या सीरिजचं नाव 'द फॅमिली मॅन सीझन 3' हे आहे. ईशान्य भारतातील वाढत्या तणावावर आधारित ही फिल्म आहे. श्रीकांत तिवारी (Manoj Bajpayee) एका मोठ्या कटाचा तपास करतो ज्यामध्ये चीनचा सहभाग आहे. तसेच संरक्षण उद्योगातील काही लोकांचा हात आहे. यामुळे भारताच्या शांततेवर परिणाम होतो. त्यामुळे श्रीकांत तिवारीचं वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्य धोक्यात येतं. त्याला 'रुक्मा' या नव्या खलनायकाचा सामना करावा लागतो.
advertisement
4/7
'द फॅमिली मॅन 3' ही सीरिज तुम्ही पाहिली नसेल तर येणाऱ्या लाँग वीकेंडला ही सीरिज तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. या सीरिजचे तिन्ही सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत.
advertisement
5/7
'द फॅमिली मॅन 3' ही सीरिज 21 नोव्हेंबर 2025 रोजी प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली आहे. रिलीजच्या एका महिन्यानंतरही ही सीरिज प्राईम व्हिडीओवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.
advertisement
6/7
'द फॅमिली मॅन 3' या सीरिजमध्ये मनोज बाजपेयी नेहमीप्रमाणे श्रीकांत तिवारीच्या भूमिकेत आहे. तर जयदीप अहलावतने रुक्मा हे पात्र साकारलं आहे. तर तिसऱ्या सीझनमध्ये निम्रत कौरदेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकली आहे.
advertisement
7/7
'द फॅमिली मॅन सीझन 3' या सीरिजचे एकूण 7 एपिसोड आहेत. राज अँड डीके यांनी या सीरिजची कथा लिहिली आहे. मनोज बाजपेयी, जयदीप अहलावत, निम्रत कौर, प्रियमणि, शारिब हाशमी, अश्लेषा ठाकुर, वेदांत सिन्हा, शरद केळकर, दलीप ताहिल हे कलाकार या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
7 एपिसोडची ही स्पाय-थ्रिलर सीरिज, रिलीजच्या एक महिन्यानंतरही Prime Video वर करतेय ट्रेंड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल