Virat Kohli : ना TV वर मॅच, ना प्रेक्षक, मैदानात 13 खेळाडूंसमोर विराट कोहलीचे गुपचूप रचला विक्रम
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
कोहलीचे हे शतक अशावेळी आले आहे, ज्यावेळी ना हा सामना टीव्हीवर दाखवला जात आहे, आणि ना हा सामना प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडतोय.
advertisement
1/7

टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली आज तब्बल 15 वर्षांनी देशांतर्गत क्रिकेट म्हणजेच विजय हजारे ट्ऱॉफी स्पर्धेत खेळताना दिसला आहे.
advertisement
2/7
या स्पर्धेत खेळताना दिल्लीकडून खेळताना विराट कोहलीने 83 बॉलमध्ये शतक ठोकलं आहे.या दरम्यान त्याने 3 षटकार आणि 10 चौकार मारले आहेत. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 121.7 होता.
advertisement
3/7
विशेष म्हणजे याआधी त्याने 39 बॉलमध्ये अर्धशतक ठोकलं होतं.त्यानंतर फलंदाजीचा तोच वेग कायम ठेवत त्याने 83 बॉलमध्ये शतक ठोकलं आहे.
advertisement
4/7
कोहलीचे हे शतक अशावेळी आले आहे, ज्यावेळी ना हा सामना टीव्हीवर दाखवला जात आहे, आणि ना हा सामना प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडतोय. फक्त 13 खेळाडूंसमोर त्याने हे शतकं ठोकलं आहे. 13 खेळाडू म्हणजे आंध्रप्रदेशचे 11 आणि नितीश राणा आणि तो स्वत: असे 13 खेळाडू.
advertisement
5/7
विशेष म्हणजे हे शतक ठोकताना त्याने एकगुप एक रेकॉर्ड देखील केला आहे. कोहलीने लिस्ट ए क्रिकेटमध्ये 16,000 धावा पूर्ण केल्या आहेत. आतापर्यंतचा सर्वात वेगवान विक्रम आहे आणि तो केवळ सचिन तेंडुलकरच्या विक्रमाच्या मागे आहे.
advertisement
6/7
बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्सच्या मैदानात आंध्रप्रदेश विरूद्ध कोहलीने आपल्या 330व्या डावात 16,000 लिस्ट ए धावा पूर्ण केल्या आहेत.
advertisement
7/7
खरं तर दिल्ली आणि आंध्रप्रदेशचा हा सामना बंगळुरूच्या सेंटर ऑफ एक्सीलेन्सच्या मैदानात खेळवला जात आहे. या मैदानात प्रेक्षकांच्या बसण्याची व्यवस्था नाही आहे. त्यामुळे मैदानात प्रेक्षक नाही आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Virat Kohli : ना TV वर मॅच, ना प्रेक्षक, मैदानात 13 खेळाडूंसमोर विराट कोहलीचे गुपचूप रचला विक्रम