रक्ताने माखलेले हात, शरीरभर जखमा; प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे प्रसिद्ध अभिनेत्याचा भीषण अपघात, PHOTO
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Marathi Actor Road Accident: प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सुप्रीतवर जीवघेणा प्रसंग ओढावला होता. पण म्हणतात ना, 'देव तारी त्याला कोण मारी!'
advertisement
1/8

मुंबई : झी मराठीवरील 'सावळ्याची जणू सावली' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. सतत टीआरपी यादीमध्ये अव्वल स्थानावर राहिलेल्या या मालिकेतील कलाकार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहिले आहेत.
advertisement
2/8
मालिकेमध्ये नीलची भूमिका साकारणारा अभिनेता सुप्रित कदम सध्या चर्चेत आला आहे. सुप्रीतसोबत नुकताच एक असा थरारक प्रसंग घडला, ज्याने त्याच्या चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. प्रशासनाचा हलगर्जीपणामुळे सुप्रीतवर जीवघेणा प्रसंग ओढावला होता. पण म्हणतात ना, 'देव तारी त्याला कोण मारी!', या म्हणीचा प्रत्यय सुप्रीतला आला आहे.
advertisement
3/8
वांद्रे येथील कार्टर रोड, जिथे संध्याकाळच्या वेळी प्रचंड वर्दळ असते, तिथे ७ फेब्रुवारीच्या संध्याकाळी हा भीषण अपघात घडला. सुप्रीतने सोशल मीडियावर आपल्या जखमांचे फोटो शेअर करत त्या रात्रीचा थरार मांडला आहे.
advertisement
4/8
कार्टर रोडवर त्या वेळी स्ट्रीट लाईट्स पूर्णपणे बंद होत्या. चहुबाजूला काळोख पसरलेला असताना अचानक एक काळ्या रंगाचा कुत्रा त्याच्या बाईकसमोर आला. अंधारामुळे समोर काहीच न दिसल्याने सुप्रीतचा तोल गेला आणि तो बाईकवरून जोरात फेकला गेला.
advertisement
5/8
सुप्रीत सांगतो, "रस्त्यावरचे दिवे गेलेले होते आणि त्यात काळ्या रंगाचा कुत्रा समोर आल्याने काहीच सुचलं नाही. अपघात खूप भीषण होता, पण आज मी तुमच्यासमोर बोलतोय ते फक्त आणि फक्त माझ्या हेल्मेटमुळे. आपण कितीही सुरक्षित गाडी चालवली तरी समोरच्या परिस्थितीमुळे आपल्यावर असा प्रसंग ओढवू शकतो." त्याने आपल्या पोस्टद्वारे चाहत्यांना हेल्मेट वापरण्याचं कळकळीचं आवाहनही केलं आहे.
advertisement
6/8
एकीकडे अपघाताच्या खुणा अंगावर असताना, दुसरीकडे सुप्रीतच्या कामाप्रती असलेल्या निष्ठेने सर्वांनाच थक्क केलं आहे. इतकी गंभीर दुखापत होऊनही सुप्रीतने सेटवर दांडी मारली नाही. तो दररोज १४-१४ तास शूटिंग करून आपलं काम पूर्ण करत आहे.
advertisement
7/8
मालिकेतील त्याची सहकलाकार आणि मुख्य नायिका प्राप्ती रेडकर हिने सुप्रीतचं कौतुक करताना म्हटलं, "इतकं लागलं असूनही तू रोज १४ तास न थकता शूट करतोयस, तुला हॅट्स ऑफ!" तर 'सोहम'ची भूमिका साकारणाऱ्या रुचीरने आणि अभिनेता आदिश वैद्यनेही सुप्रीतच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत त्याला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
advertisement
8/8
मुंबईसारख्या शहरात कार्टर रोडसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी पथदिवे बंद असणं, हा प्रशासनाचा मोठा हलगर्जीपणा असल्याचा संताप आता चाहत्यांकडून व्यक्त होत आहे. एका अभिनेत्याचा जीव थोडक्यात वाचला असला, तरी सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचं काय? असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
रक्ताने माखलेले हात, शरीरभर जखमा; प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे प्रसिद्ध अभिनेत्याचा भीषण अपघात, PHOTO