TRENDING:

स्टारकिड पण डेब्यूआधीच उद्ध्वस्त झाला! फ्लॉपवर फ्लॉप फिल्म, प्रेमातही मिळाला धोका

Last Updated:
लहानपणापासूनच चित्रपट जगताशी जवळीक असूनही नशिबाने अभिनेत्याला साथ दिली नाही. त्याचं वैयक्तिक आयुष्य अडचणींनी भरलेलं होतं.
advertisement
1/7
स्टारकिड पण डेब्यूआधीच उद्ध्वस्त झाला! फ्लॉपवर फ्लॉप फिल्म, प्रेमातही मिळाला धोक
एक स्टारकिड ज्याने त्याच्या करिअरची सुरुवात हिट चित्रपटांनी केली होती, पण तो आता एकामागून एक फ्लॉप फिल्म देत आहे. आपल्या कारकिर्दीच्या आधी त्याने आई गमावली. त्यानंतर वेदना, संघर्ष आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी सतत संघर्ष सुरू झाला. प्रेमात या अभिनेत्याचा विश्वासघात झाला
advertisement
2/7
तो प्रसिद्ध अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून कपूर कुटुंबाचा लाडका मुलगा अर्जुन कपूर आहे. अर्जुन कपूरचे आईवडील बोनी कपूर आणि मोना शौरी कपूर यांचा 1995 मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर अर्जुन आणि त्याची बहीण अंशुला यांची आई मोना हा त्यांचा एकमेव आधार होती.
advertisement
3/7
अभिनेता होण्यापूर्वी अर्जुन कपूरने पडद्यामागेही काम केलं. 2003 मध्ये त्याने निखिल अडवाणीच्या 'कल हो ना हो' चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. तसंच वडील बोनी कपूर यांना 'नो एंट्री' आणि 'वॉन्टेड' सारख्या चित्रपटांमध्ये मदत केली.
advertisement
4/7
त्यानंतर 2012 मध्ये परिणीती चोप्रा सोबत 'इशकजादे' या चित्रपटातून त्याने मुख्य भूमिकेत पदार्पण केलं. हा चित्रपट खूप हिट ठरला. पण त्याच्या यशात नशिबाने त्याला मोठा धक्का दिला. ही फिल्म रिलीज होण्याआधी त्याच्या आईचं कॅन्सरमुळे निधन झालं.
advertisement
5/7
अर्जुन कपूरचा हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातील अर्जुनच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं. त्याच्या रोमँटिक स्टाईलने मनं जिंकलीच पण यासाठी त्याला पुरस्कारही मिळाले. पण या चित्रपटाच्या यशानेही त्याच्या कारकिर्दीला चालना दिली नाही.
advertisement
6/7
त्याने यानंतर '2 स्टेट्स', 'फाइंडिंग फॅनी', 'की अँड का', 'गुंडे', 'नमस्ते इंग्लंड', 'पानिपत', 'सरदार का ग्रँडसन', 'भूत पोलिस', 'संदीप और पिंकी फरार', 'एक व्हिलन रिटर्न्स', 'कुट्टे' आणि 'द लेडी किलर' यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. पण त्याचे चित्रपट हिटपेक्षा जास्त फ्लॉप ठरले आहेत.
advertisement
7/7
अर्जुन कपूरचं वैयक्तिक आयुष्यही फारसं नीट नाही. मलायका अरोरासोबतचं त्याचं नातं बराच काळ चर्चेत राहिलं, पण ते नातंही संपुष्टात आलं. प्रेमातील विश्वासघात आणि करिअरमधील अपयशामुळे अर्जुन आतून तुटला, पण त्याने कधीही हार मानली नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
स्टारकिड पण डेब्यूआधीच उद्ध्वस्त झाला! फ्लॉपवर फ्लॉप फिल्म, प्रेमातही मिळाला धोका
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल