Asha Bhosle Birthday: 91 वर्षांच्या झाल्या आशा भोसले..! फक्त गायनच नाही तर 'या' 2 क्षेत्रातही आहे जबरदस्त पकड
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Asha Bhosle birthday: आशा भोसले त्यांचा 91 वा वाढदिवस साजरा करत आहेत. याच निमित्ताने त्यांच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया. फक्त गाण्यातच नाही तर आणखी दोन वेगळ्या क्षेत्रातही आशाजींचा जम आहे.
advertisement
1/7

भारतीय संगीतसृष्टीत दोन आवाज कायमच देवासमान मानले जातात लता मंगेशकर आणि आशा भोसले. लतादीदींनी आपल्या सुरांनी संपूर्ण जग जिंकलं, तर आशा ताईंनी गाण्याला एक वेगळाच थाट दिला. त्या गोड, चंचल, कधी खट्याळ तर कधी भावूक स्वरांच्या आशा भोसलेंचा उद्या 8 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे.
advertisement
2/7

आशा भोसले त्यांचा 91 वा वाढदिवस साजरा करत आहेत. याच निमित्ताने त्यांच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया. फक्त गाण्यातच नाही तर आणखी दोन वेगळ्या क्षेत्रातही आशाजींचा जम आहे.
advertisement
3/7
8 सप्टेंबर 1933 रोजी सांगली येथे जन्मलेल्या आशा ताईंनी लहान वयातच आपल्या कलेची जादू दाखवली. फक्त 11व्या वर्षी ‘चला चला नव बाल’ या मराठी गाण्याद्वारे त्यांनी रंगभूमीवर पाऊल ठेवले. 16व्या वर्षीच त्यांचं पहिलं हिंदी एकल गीत चित्रपट रात की रानी मध्ये आलं. त्यानंतर तर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही.
advertisement
4/7
आशा भोसले या फक्त गाण्यातच नाही तर बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी गझल, ठुमरी, पॉप, कव्वाली, म्युझिकल डान्स नंबर्स अशा प्रत्येक प्रकारात स्वतःची छाप सोडली. म्हणूनच आशा ताईंना आज "हरफनमौला गायिका" म्हटलं जातं.
advertisement
5/7
गायनासोबतच त्यांना स्वयंपाकाची प्रचंड आवड आहे. या आवडीला त्यांनी व्यवसायात रूपांतरित केलं आणि दुबई, अबू धाबी, कुवेत, बहरैन, मँचेस्टर, बर्मिंगहॅम इथं Asha’s नावाची रेस्टॉरंट्स सुरू केली. जिथे खवय्यांना आशा ताईंची गाणी ऐकता ऐकता त्यांच्याच रेसिपीची चव चाखायला मिळते.
advertisement
6/7
आशा ताईंनी आयुष्यभर संघर्ष आणि यशाची गोड सांगड घातली. गणपतराव भोसले यांच्याशी झालेलं पहिलं लग्न, त्यानंतर आर.डी. बर्मनसोबतची मैत्री आणि संसार त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक वळणं आली. मात्र या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी स्वतःला नव्याने सिद्ध केलं. 79 व्या वर्षी त्यांनी मराठी चित्रपट माई मध्ये अभिनय करून चाहत्यांना नव्या रूपात आश्चर्यचकित केलं.
advertisement
7/7
91 व्या वर्षीही आशा ताईंचा आवाज तोच गोडवा, तीच ऊर्जा आणि तीच जादू घेऊन पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देतो आहे. खरं तर त्यांचं आयुष्य हे गाण्यासारखं आहे कधी रुमानी, कधी विरहपूर्ण, कधी जोशात, तर कधी दिलासा देणारं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Asha Bhosle Birthday: 91 वर्षांच्या झाल्या आशा भोसले..! फक्त गायनच नाही तर 'या' 2 क्षेत्रातही आहे जबरदस्त पकड