TRENDING:

Chandragrahan 2025: शुद्धता जशीच्या तशी! चंद्रग्रहणानंतर रात्री किंवा सकाळी न चुकता करावीत ही 4 कामे

Last Updated:
After Lunar Eclipse Astro Tips: भारतात धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून चंद्रग्रहण नेहमीच विशेष मानले गेले आहे. या काळात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि शुभ कामे केली जात नाहीत. ग्रहणाच्या वेळी ज्याप्रमाणे नियमांचे पालन करणे आवश्यक असते, त्याचप्रमाणे ग्रहणानंतर काही कामे करणे आवश्यक मानले जाते. ग्रहण संपताच पारंपरिकपणे काही विशेष कामे केली जातात. त्यामुळे पवित्रता आणि सकारात्मकता टिकून राहते. तसेच, कुटुंबात काही दोष असतील तर ते देखील संपतात, असे मानले जाते,
advertisement
1/5
शुद्धता जशीच्या तशी! चंद्रग्रहणानंतर रात्री किंवा सकाळी न चुकता करावीत ही 4 कामे
ज्योतिषशास्त्रात, ग्रहणानंतर काही कामे करण्यास सांगितले आहे, जेणेकरून कुटुंबाची पवित्रता टिकून राहते. चंद्रग्रहणानंतर कोणती कामे करावीत जाणून घेऊया.
advertisement
2/5
चंद्रग्रहणानंतर करावयाची कामे -स्नान आणि शुद्धीकरण - चंद्रग्रहण संपल्यानंतर स्नान हे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे काम मानले जाते. स्नानाच्या पाण्यात थोडेसे गंगाजल घालावे, ते शरीर आणि मनाच्या शुद्धीकरणाशी संबंधित आहे.
advertisement
3/5
घराची स्वच्छता - ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्रग्रहणानंतर घराचे वातावरण शुद्ध करावे. यासाठी संपूर्ण घर स्वच्छ करा आणि घरातील देव्हाराही पूर्णपणे स्वच्छ करा. शक्य असल्यास पाण्यात मीठ घालून फरशी पुसून टाका. ग्रहण मध्यरात्री संपणार असल्याने संपूर्ण घरात गंगाजल शिंपडा. दुसऱ्या दिवशी सकाळी पाण्यात मीठ घालून संपूर्ण घर पुसून काढी. यामुळे घरात असलेल्या ग्रहणाची नकारात्मकता दूर होते.
advertisement
4/5
दान - चंद्रग्रहणानंतर सकाळी गरीब किंवा गरजूंना अन्न, कपडे किंवा पैसे दान केल्याने विशेष पुण्य मिळते. हे ग्रहण रात्री संपणार असल्यानं दुसऱ्या दिवशी दान करा. तीळ, तांदूळ, दूध, मीठ, पांढरे कपडे किंवा चांदी यासारख्या पांढऱ्या वस्तू दान करणे शुभ मानले जाते, या सर्व गोष्टी चंद्राशी संबंधित आहेत, ज्यामुळे ग्रहण दोष दूर होतो.
advertisement
5/5
अन्न खाण्याविषयी - सूतक काळात शिजवलेले अन्न खाणे अशुद्ध मानले जाते, म्हणून ग्रहण काळात ठेवलेले अन्न किंवा पाणी देखील सोडून द्यावे, ते ग्रहणानंतर खाऊ नये. अनेक लोकांचा असा विश्वास आहे की ग्रहणानंतर मंत्र जप आणि ध्यान केल्याने मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Chandragrahan 2025: शुद्धता जशीच्या तशी! चंद्रग्रहणानंतर रात्री किंवा सकाळी न चुकता करावीत ही 4 कामे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल