TRENDING:

Overeating Side Effects : काय सांगता..! आता पोटभर जेवणंही चुकीचं? पाहा तज्ज्ञांनी का दिला असा विचित्र सल्ला

Last Updated:
Healthy eating habits : आपल्याकडे नेहमी म्हंटलं जातं की पोटभर जेवावं. आई नेहमी म्हणते पोटभर जेवत जा, कमी जेवल्यानं तब्येत खराब होईल. पण तज्ज्ञांचं मत मात्र काहीतरी वेगळंच आहे. तज्ञांच्यामते, आपण पोटभर जेवू नये. पण असं का? चला जाणून घेऊया तज्ज्ञांकडून.
advertisement
1/7
काय सांगता! आता पोटभर जेवणंही चुकीचं? पाहा तज्ज्ञांनी का दिला असा विचित्र सल्ला
तज्ञांच्यामते, आपण नेहमी आपल्या भूकेपेक्षा दोन चपात्या किंवा तेवढे अन्न कमी खावे. या सल्ल्याला एक सखोल वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक आधार आहे. डॉ. पल्लव प्रजापती यांनी लोकल 18 शी बोलताना याबद्दल महिती दिली.
advertisement
2/7
त्यांच्यामते, पोटभर न जेवता पोटात थोडी भूक शिल्लक ठेवावी किंवा कमी जेवावे. हे निरोगी जीवनाचे मूलभूत तत्व आहे. डॉ. प्रजापती यांनी पुढे सांगितले, आपल्या पोटाची रचना अशी आहे, ज्यामध्ये अन्नासाठी पुरेशी जागा, पाणी आणि वायू असणे आवश्यक आहे.
advertisement
3/7
अशात जर आपण पोट पूर्णपणे अन्नाने भरले तर पचन प्रक्रियेवर परिणाम होतो. पोटातील एंजाइम्सना अन्नात योग्यरित्या मिसळण्यासाठी जागा आवश्यक असते. जर ही जागा उपलब्ध नसेल तर अन्नाचे योग्य पचन होत नाही आणि गॅस, ऍसिडिटी, ढेकर अशा समस्या निर्माण होतात.
advertisement
4/7
डॉक्टरांनी हे एक सोपं उदाहरण देऊन स्पष्ट केलं. जसं आपण मिक्सरमध्ये मसाले बारीक करताना भांडं काठोकाठ भरत नाही. घटक फिरण्यासाठी आणि योग्यरित्या मिसळण्यासाठी जागा सोडतो. तसंच पोताचंही आहे. आपल्या पोटाला अन्न पचवण्यासाठी जागा आवश्यक असते. जर आपण जास्त खाल्लं तर गॅस तयार होतो आणि त्याला पसरण्यासाठी पुरेशी जागा मिळत नाही. मग ऍसिड रिफ्लक्स, जडपणा आणि अपचन होते.
advertisement
5/7
डॉ. प्रजापती यांनी आयुर्वेदाचा संदर्भ देत सांगितलं की, जास्त खाण्यामुळे शरीरात 'अम' विकसित होतो. आयुर्वेदात याला विषारी टाकाऊ पदार्थ म्हणतात, जे न पचलेल्या अन्नामुळे शरीरात जमा होतात. हा 'अम' हळूहळू अनेक रोगांचे मूळ कारण बनू शकतो. त्यांनी सांगितलं की गॅस, मायग्रेन, संधिवात आणि त्वचेच्या समस्यांचं एक प्रमुख कारण म्हणजे पचन बिघडणं.
advertisement
6/7
तज्ञांच्यामते, आयुर्वेदात पोटाला अनेक रोगांचं मूळ कारण मानलं जातं. पचन चांगलं असेल तर शरीराला पुरेसं पोषण मिळतं, ऊर्जा राखली जाते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. मात्र सतत जडपणा आणि अपचन होत असेल तर शरीरात विषारी पदार्थ जमा होऊ लागतात, ज्यामुळे गंभीर आजार होऊ शकतात.
advertisement
7/7
डॉक्टर प्रजापतींनी आणखी एक सल्ला दिला. त्यांनी सांगितले की, जेवणानंतर लगेच जास्त पाणी पिऊ नये. जेवणानंतर काही वेळाने प्या. जेवणानंतर हलके चालल्याने पचन सुधारते. तुमच्या भुकेपेक्षा थोडे कमी खाणे, वेळेवर पाणी पिणे आणि जेवणानंतर फिरणे या गोष्टींचे पालन केल्यास तुम्ही दीर्घकाळ निरोगी राहू शकता. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Overeating Side Effects : काय सांगता..! आता पोटभर जेवणंही चुकीचं? पाहा तज्ज्ञांनी का दिला असा विचित्र सल्ला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल