TRENDING:

सावधान! राज्यातून हजारो अल्पवयीन मुली बेपत्ता; पालकांची ही एक छोटी चूक ठरतीये कारण? धक्कादायक वास्तव समोर

Last Updated:

या समस्येमागे सोशल मीडियाचे वाढते आकर्षण हे प्रमुख कारण आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक यांसारख्या प्लॅटफॉर्मवरून अनोळखी व्यक्तींशी वाढणारा संपर्क आणि त्यातून निर्माण होणारे प्रेमसंबंध मुलींना भावनिक निर्णय घेण्यास प्रवृत्त करत आहेत

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: महाराष्ट्र राज्यात गेल्या काही वर्षांपासून अल्पवयीन मुली घरातून बेपत्ता होण्याच्या किंवा पळून जाण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पोलीस आणि बालकल्याण विभागाच्या आकडेवारीनुसार, मुलांपेक्षा मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक असल्याने ही बाब प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरली आहे. पुणे, मुंबई, ठाणे आणि नाशिकसारख्या मोठ्या शहरांमध्ये या तक्रारींचा आलेख सर्वाधिक आहे.
राज्यातून हजारो अल्पवयीन मुली बेपत्ता (प्रतिकात्मक फोटो)
राज्यातून हजारो अल्पवयीन मुली बेपत्ता (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

नेमकी कारणं काय?

तज्ज्ञांच्या मते, या समस्येमागे सोशल मीडियाचे वाढते आकर्षण हे प्रमुख कारण आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक यांसारख्या प्लॅटफॉर्मवरून अनोळखी व्यक्तींशी वाढणारा संपर्क आणि त्यातून निर्माण होणारे प्रेमसंबंध मुलींना भावनिक निर्णय घेण्यास प्रवृत्त करत आहेत. याशिवाय, मोबाइलचा अतिवापर, कुटुंबातील संवादाचा अभाव आणि छोट्याशा कारणावरून होणारे कौटुंबिक वाद यामुळेही मुली घर सोडण्याचे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे दिसून आले आहे.

advertisement

पालकांसाठी धोक्याची घंटा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
AI चा खास कोर्स मोफत शिका! पिंपरी चिंचवडमध्ये कुठे करायची नावनोंदणी?
सर्व पहा

घर सोडल्यानंतर अनेक मुली मानवी तस्करी किंवा इतर गुन्हेगारी जाळ्यात अडकण्याची भीती असते. यावर उपाय म्हणून पालकांनी मुलांशी संवाद वाढवणे गरजेचे आहे. मुलांच्या ऑनलाइन हालचालींवर लक्ष ठेवणे, त्यांच्या मित्रांची माहिती ठेवणे आणि त्यांना भावनिक आधार देणे आवश्यक आहे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. शाळा-महाविद्यालयांमध्येही सोशल मीडियाच्या सुरक्षित वापराबाबत जनजागृती करण्याची गरज व्यक्त होत आहे. पोलीस प्रशासन सध्या 'ऑपरेशन मुस्कान' सारख्या मोहिमांतून बेपत्ता मुलांचा शोध घेत असले तरी, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कुटुंबातील सुसंवादच सर्वात महत्त्वाचा ठरत आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
सावधान! राज्यातून हजारो अल्पवयीन मुली बेपत्ता; पालकांची ही एक छोटी चूक ठरतीये कारण? धक्कादायक वास्तव समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल