फाइव्ह स्टार हॉटेलसारखं घर, 150 बॉडीगार्ड्स, 800 साड्या; Bigg Boss फेम 'करोडपती' तान्या मित्तलचा होणारा नवरा आहे कोण?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bigg Boss Tanya Mittal : बिग बॉस 19 फेम तान्या मित्तल तिच्या लॅव्हिश लाइफस्टाईलमुळे चर्चेत आली होती. आता तिने तिचे ब्राइडल लेहंग्यातील व्हिडीओ पोस्ट केल्यामुळे तिच्या लग्नाची आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याची चर्चा होते आहे.
advertisement
1/5

बिग बॉस फेम तान्या मित्तल, बिग बॉस 19 टॉप 5 फायनलिस्टपैकी एक होती. बिग बॉसमधील बहुतेक स्पर्धक हे वाद, भांडण, प्रेम यामुळे चर्चेत असतात. पण तान्या मित्तल मात्र तिच्या लॅव्हिश लाइफमुळे चर्चेत राहिली. तान्या मित्तलने घरामध्ये केलेले अनेक दावे इतके मोठे होते की, तिच्या खऱ्या आयुष्याबद्दल लोकांना शंका वाटू लागली.
advertisement
2/5
तान्याने सांगितलं होतं की, तिचं घर स्वर्गापेक्षाही सुंदर असून घरात लिफ्ट्स आहेत, तिच्याकडे 150 हून अधिक बॉडीगार्ड्स आहेत, तिचे अनेक व्यवसाय कोट्यवधी रुपयांची उलाढाल करतात, ती कधीही एक साडी पुन्हा वापरत नाही आणि तिच्याकडे केवळ साड्या आणि मॅचिंग दागिन्यांसाठी एक वेगळी खोली आहे. दुबईहून मागवलेले बकलावा आणि ताजमहलच्या मागच्या बागेत बसून कॉफी पिणे, याची चर्चाही तिच्या गप्पांमध्ये असायच्या.
advertisement
3/5
तान्या मित्तल ही केवळ सोशल मीडिया इन्फ्लुएंसर नाही. ती मॉडेल, उद्योजिका आणि मिस एशिया टूरिझम 2018 ची विजेती आहे. तिने 'हँडमेड लव्ह' नावाचा स्वतःचा हँडबॅग ब्रँड यशस्वीपणे सुरू केला. ती तिच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये स्वतःला सर्वात कमी वयाची करोडपती असल्याचं सांगते, तिच्याकडे सुमारे 2 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचा अंदाज आहे.
advertisement
4/5
अशी ही करोडपती तान्या मित्तल जी आता पुन्हा चर्चेत आली आहे, याचं कारण म्हणजे तिने तिचे ब्राइडल लेहंग्यातील पोस्ट केलेले व्हिडीओ. तान्याने लाल आणि निळ्या रंगातील लेहंग्यातील व्हिडीओ पोस्ट केले आहेत. त्यात तयारी सुरू झाली, त्याला हे आवडेल का? असं कॅप्शन दिलं आहे. यामुळे ती लग्न करत असल्याची चर्चा आहे.
advertisement
5/5
तिच्या या पोस्टवर बऱ्याच कमेंट आल्या आहेत. बहुतेकांनी आपल्याला हार्ट अटॅकच आल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी तिचा होणारा नवरा कोण आहे? अशीही विचारणा केली आहे. दरम्यान खरंच तान्या लग्न करते आहे का? याबाबत तिने स्पष्टपणे सांगितलंन नाही. तसंच तिचा होणारा नवरा कोण आहे? याबाबतही माहिती नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
फाइव्ह स्टार हॉटेलसारखं घर, 150 बॉडीगार्ड्स, 800 साड्या; Bigg Boss फेम 'करोडपती' तान्या मित्तलचा होणारा नवरा आहे कोण?