TRENDING:

'त्याच्या नादाला लागलो...' मराठीचा सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे, बॉलिवूड अभिनेत्यामुळे खावा लागलेला बेदम मार, कोण आहे तो?

Last Updated:
Laxmikant Berde: लक्ष्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. मात्र, बॉलिवूडचा असा एक अभिनेता होत्या, ज्याच्यामुळे लक्ष्मीकांत बेर्डे यांना बेदम मार खावा लागला होता.
advertisement
1/11
मराठीचा सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे,बॉलिवूड अभिनेत्यामुळे खावा लागलेला बेदम मार
मराठी चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार आणि ज्यांच्या नुसत्या नावावर थिएटरबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड लागायचे, ते म्हणजे आपले लाडके लक्ष्मीकांत बेर्डे. लक्ष्या आज आपल्यात नसला तरी त्याच्या आठवणींचा साठा कधीच संपणारा नाही.
advertisement
2/11
अभिनयाने जगाला हसवणाऱ्या या माणसाने स्वतःच्या संघर्षाचे आणि बालपणीचे अनेक किस्से मोठ्या दिलदारपणे सांगितले होते. असाच एक किस्सा आहे चक्क बॉलिवूड सुपरस्टारमुळे लक्ष्याला पडलेल्या माराचा.
advertisement
3/11
त्या काळात बॉलिवूड अभिनेता जितेंद्रची प्रचंड क्रेझ होती. पांढरे शूज आणि घट्ट पॅन्ट ही त्यांची सिग्नेचर स्टाईल तरुणाईमध्ये तुफान लोकप्रिय झाली होती. आपला लक्ष्याही त्याला अपवाद नव्हता.
advertisement
4/11
एका मुलाखतीत लक्ष्याने सांगितलं होतं की, त्याकाळी हिरो जे करायचे तीच फॅशन व्हायची. जितेंद्रची ती टाइट पॅन्ट पाहून लक्ष्यालाही मोह आवरला नाही. घरची परिस्थिती बेताची असतानाही त्यांनी हट्ट करून तशीच घट्ट पॅन्ट शिवून घेतली.
advertisement
5/11
पण फॅशन नडली ती इथेच. ती पॅन्ट इतकी घट्ट होती की लक्ष्याला साधं उठता-बसताही येईना. अखेर एके दिवशी हालचाल करताना ती महागडी पॅन्ट मधूनच फाटली.
advertisement
6/11
आधीच परिस्थिती बेताची आणि त्यात मुलाने हट्ट करून शिवलेली महागडी पॅन्ट फाडल्यामुळे वडिलांचा पारा चढला आणि लक्ष्याला त्या दिवशी चांगलाच मार खावा लागला होता.
advertisement
7/11
पुढच्या काळात जेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे यांनी हिंदी चित्रपटांत काम करायला सुरुवात केली, तेव्हा एका मुलाखतीदरम्यान खुद्द जितेंद्र तिथे हजर होते.
advertisement
8/11
तेव्हा लक्ष्याने मोठ्या मिश्किलपणे सांगितलं, "सर, तुमच्या त्या टाइट पॅन्टच्या स्टाईलमुळे मी लहानपणी वडिलांचा खूप मार खाल्लाय." लक्ष्याचा हा प्रांजळ कबुलीनामा ऐकून जितेंद्रसह तिथे उपस्थित असलेले सर्वच जण हसून हसून लोटपोट झाले होते.
advertisement
9/11
लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म एका मध्यमवर्गीय घरात झाला. पाच भावंडांच्या गोतावळ्यात आर्थिक ओढाताण असायची, पण आईच्या खेळकर स्वभावामुळे घरात आनंदी वातावरण असायचं.
advertisement
10/11
लक्ष्याला लहानपणी वाटायचं की मोठं झाल्यावर बस कंडक्टर बनावं. त्यामागचं कारणही तितकंच निरागस होतं. कंडक्टरकडे तिकिटांचे खूप पैसे असतात, ते सगळे पैसे स्वतःकडे ठेवून आपण श्रीमंत होऊ, असं बालवयातील लक्ष्याला वाटायचं.
advertisement
11/11
पण जेव्हा त्याला कळलं की ते पैसे सरकारी तिजोरीत जमा करावे लागतात, तेव्हा त्यांनी कंडक्टर व्हायचा नाद सोडला आणि ते अभिनयाकडे वळले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'त्याच्या नादाला लागलो...' मराठीचा सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे, बॉलिवूड अभिनेत्यामुळे खावा लागलेला बेदम मार, कोण आहे तो?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल