TRENDING:

BB 19 चा गाजावाजा, दिसणार Bigg Boss Marathi 5 चा धडाकेबाज चेहरा? अभिनेत्यानेच दिली हिंट, म्हणाला...

Last Updated:
Bigg Boss Season 19 : बिग बॉस मराठी 5 या पर्वातील एक धडाकेबाज खेळाडू सलमान खान होस्ट करत असलेल्या बिग बॉसच्या 19 व्या पर्वात धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे.
advertisement
1/10
BB 19 चा गाजावाजा, दिसणार Bigg Boss Marathi 5 चा धडाकेबाज चेहरा?
बिग बॉस हा शो जितका वादग्रस्त आहे, तितकीच त्याची फॅन फॉलोविंगही तुफान आहे. यंदा या शोचं 19 वं सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबाबत चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.
advertisement
2/10
यंदाच्या पर्वात कोणकोणते कलाकार या घरात धुमाकूळ घालणार हे पाहण्यासाठी सर्वच आतुर झाले आहेत. याबद्दल अनेक नावं समोर येत आहेत.
advertisement
3/10
यासंबंधीची एक नवी अपडेट समोर आली असून या बातमीमुळे बिग बॉस फॅन्सचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. गेल्या वर्षी बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व तुफान गाजलं होतं. संपूर्ण महाराष्ट्रात फक्त याच कार्यक्रमाची चर्चा सुरू होती.
advertisement
4/10
नुकतंच समोर आलेल्या माहितीनुसार, या पर्वातील एक धडाकेबाज खेळाडू सलमान खान होस्ट करत असलेल्या बिग बॉसच्या 19 व्या पर्वात धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. हा अभिनेता दुसरा कोणी नसून अरबाझ पटेल आहे.
advertisement
5/10
बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात निक्की तांबोळी आणि अरबाझ पटेल यांनी संपूर्ण घर डोक्यावर घेतलं होतं. पूर्ण घर त्यांच्या अवतीभोवती फिरत होतं. अरबाझला हा शो जिंकता आला नसला, तरीही त्याच्या खेळाचं खूप कौतुक झालं होतं.
advertisement
6/10
यामुळे त्याची लोकप्रियता झपाट्याने वाढली होती. अशातच आता स्प्लिट्सव्हिला 15 आणि बिग बॉस मराठी 5 नंतर आता अरबाझ पटेल सलमान खानच्या बिग बॉस 19 मध्ये एन्ट्री करणार असल्याची बातमी समोर आली आहे.
advertisement
7/10
अरबाझ पटेल बिग बॉस 19 मध्ये दिसू शकतो याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसली, तरीही काही रिपोर्ट्सनुसार, तो या शोमध्ये भाग घेऊ शकतो.
advertisement
8/10
एका सोशल मीडिया पेजने दिलेल्या माहितीनुसार, अरबाझ पटेलने त्यांच्या ब्रॉडकास्ट चॅनेलवर तो एका रिॲलिटी शोमध्ये सहभागी होणार असल्याची हिंट दिली होती.
advertisement
9/10
अरबाजनं एका पोस्टमध्ये म्हटलं होतं, 'लवकरच खूप काही घडणार आहे, मज्जा येणार...माझ्यावर जळणाऱ्यांसाठीही खूप काही आहे, प्रेम करणाऱ्यांसाठी तर मी नेहमीच आहे.'
advertisement
10/10
'बिग बॉस मराठी'च्या घरात अरबाज पटेल आणि निक्की तांबोळीने धुमाकूळ घातला होता. तो या पर्वातील एक तगडा स्पर्धक होता. याच शोमध्ये त्याला त्याची गर्लफ्रेंड निक्की तांबोळी भेटली. अशीही चर्चा आहे की, निक्की तांबोळी पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात दिसू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
BB 19 चा गाजावाजा, दिसणार Bigg Boss Marathi 5 चा धडाकेबाज चेहरा? अभिनेत्यानेच दिली हिंट, म्हणाला...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल