TRENDING:

'बिग बॉस'च्या घरात आजवर कधीच घडलं नाही ते घडणार! Bigg Boss Marathi 6 मध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये जसजसे दिवस, आठवडे पुढे जात आहेत, तसतसं काही ना काही नवीन पाहायला मिळत आहे. आता आलाय सगळ्यात मोठा ट्विस्ट.
advertisement
1/7
'बिग बॉस'च्या घरात आजवर कधीच घडलं नाही ते घडणार! BBM6 मध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट
'दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार!' ही बिग बॉस मराठी 6 ची थीम, या टॅगलाइनसह बिग बॉस मराठीचा सहावा सीझन सुरू आहे. पण आता यातच मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो आहे.
advertisement
2/7
बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमधील सगळ्यात मोठा ट्विस्ट. आता फक्त दार नाही तर खिडक्याही उघडणार आहेत.
advertisement
3/7
बिग बॉस मराठी 6 च्या घरातील दिवस आठवडे जसजसे वाढत आहेत, तसतसं घरातील गेम, टास्क अधिकच कठीण होत चालला आहे.
advertisement
4/7
बिग बॉस मराठी 6 च्या नवीन एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे, ज्याला बिग बॉस मराठीच्या घरात येणार नवा ट्विस्ट, खिडकी उघडणार... धडकी भरणार! असं कॅप्शन देण्यात आलं आहे.
advertisement
5/7
प्रोमोमध्ये बिग बॉस सांगतात. आजवर अनेक दारं उघडली पण आता उघडणार आहेत खिडक्या.  या खिडकीमागून कधी येईल संकट, कधी येतील आव्हानं, तर कधी येतील पाहुणे. खिडकी उघडणार धडकी भरणार.
advertisement
6/7
बिग बॉसच्या घरातील खिडक्या उघडणार असल्याने आता घरातील सगळ्या सदस्यांना टेन्शन आलं आहे. सगळ्यांच्या चेहऱ्याचा रंग उडालेला दिसतो आहे. राकेशची अरे देवा तर सागरची काय? अशी प्रतिक्रिया पाहायला मिळते. राखी तर शेवटी मोठ्याने ओरडताना दिसते.
advertisement
7/7
त्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरातील खिडक्या उघडल्यानंतर आता नेमकं घरात काय घडणार, कोणतं संकट, कोणतं वादळ येणार हे पाहण्याची उत्सुकता आता प्रेक्षकांनाही लागून राहिली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'बिग बॉस'च्या घरात आजवर कधीच घडलं नाही ते घडणार! Bigg Boss Marathi 6 मध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल