TRENDING:

अखेर तो दिवस आलाच! Bigg Boss Marathi 6 चा पहिला फायनलिस्ट, तिकीट टू फिनाले कुणाला?

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Ticket To Finale : बिग बॉस मराठी सहाव्या सीझनचा पहिला फायनलिस्ट आता मिळणार आहे. तिकीट टू फिनालेची घोषणा करण्यात आली आहे, हे तिकीट आता कुणाला मिळणार.
advertisement
1/7
अखेर तो दिवस आलाच! Bigg Boss Marathi 6 चा पहिला फायनलिस्ट, तिकीट टू फिनाले कुणाला?
11 जानेवारी 2025 ला सुरू झालेला बिग बॉस मराठी 6 आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. आता घरातील सदस्यांमध्ये फिनालेसाठी चढाओढ सुरू आहे. अशात बिग बॉसने तिकीट टू फिनाले आणलं आहे.
advertisement
2/7
बिग बॉसने तिकीट टू फिनालेची झलक सदस्यांना दाखवली आहे. ज्यामुळे सदस्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. तिकीट टू फिनाले पाहून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
advertisement
3/7
आता सदस्यांमध्ये तिकीट टू फिनालेसाठी लढत होणार आहे. जो सदस्य तिकीट टू फिनाले जिंकेल तो फिनालेमध्ये जाईल. बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनचा तो पहिला फायनलिस्ट असेल.
advertisement
4/7
आता बिग बॉस मराठी 6 च्या घरात एकूण 7 सदस्य आहेत. यामध्ये अनुश्री माने, रेवा कौरासे, दिपाली सय्यद, राकेश बापट, विशाल कोटियन, तन्वी कोलते, राखी सावंत यांचा समावेश आहे.
advertisement
5/7
त्यामुळे या सात जणांपैकी हे तिकीट टू फिनाले कोण जिंकणार, कोणता सदस्य पहिला फायनलिस्ट ठरणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. 19 एप्रिलला बिग बॉस मराठी 6 चा फिनाले होणार आहे.
advertisement
6/7
बिग बॉस मराठीचा सहावा सीझन 17 स्पर्धकांपासून सुरू झाला होता यानंतर नंतर सुरुवाील एक आणि नंतर एकत्र 3 अशी 4 वाइल्ड कार्ड सदस्यांची एंट्री झाली.
advertisement
7/7
आतापर्यंत 14 सदस्य घराबाहेर गेले आहेत. यात सागर कारंडे, प्राजक्ता शुक्रे, राधा पाटील, करण सोनावणे, रोशन भजनकर, सचिन कुमावत, आयुष संजीव, ओमकार राऊत, दिव्या शिंदे, संकेत पाठक, संस्कृती साळुंके, रुचिता जामदार, प्रभू शेळके, सोनाली राऊत यांचा समावेश आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
अखेर तो दिवस आलाच! Bigg Boss Marathi 6 चा पहिला फायनलिस्ट, तिकीट टू फिनाले कुणाला?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल