TRENDING:

Actress Death : नवऱ्यासोबत Video Call वर बोलली, थोड्या वेळात होत्याचं नव्हतं; हाय TRP मालिकेच्या अभिनेत्रीनं आयुष्य संपवलं

Last Updated:
Serial Actress Death : हाय TRP असलेल्या मालिकेला मोठा धक्का बसला आहे. मालिकेतील अभिनेत्रीनं धक्कादायक पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवलं.
advertisement
1/8
नवऱ्यासोबत Video Call वर बोलली, थोड्या वेळात होत्याचं नव्हतं; हाय TRP मालिकेच्या अभिनेत्रीनं आयुष्य संपवलं
टेलिव्हिजनच्या जगातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रसिद्ध मालिकेतील अभिनेत्रीचा मृत्यू झाला आहे.  तिनं आत्महत्या करत आयुष्य संपवल्याची माहिती समोर आली आहे. मालिकेच्या शूटिंगनंतर तिनं हे टोकाचं पाऊल उचललं.
advertisement
2/8
अभिनेत्रीच्या मृत्यूच्या बातमीनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. अभिनेत्रीनं आत्महत्येसारखं मोठं पाऊल का उचललं असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
advertisement
3/8
अभिनेत्रीच्या मृत्यूची माहिती मिळताच तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मालिकेची संपूर्ण टीम शॉक झाली आहे.
advertisement
4/8
सुबाषिनी असं अभिनेत्रीचं नाव असून ती सन ​​टीव्हीवरील 'कयाल' या लोकप्रिय मालिकेत काम करत होती. सुबाषिनी हिनं चेन्नईतील तिच्या राहत्या घरी आत्महत्या केली.
advertisement
5/8
अभिनेत्री सुबाषिनी ही  चेन्नईतील अय्यप्पंथंगल येथील एका खाजगी अपार्टमेंटमध्ये राहत होती. ती मुळची श्रीलंकेची आहे. तर तिचा पती बंगळुरूमध्ये राहतो. पण मालिकेच्या शूटिंगसाठी अभिनेत्री पोरू येथे थांबली होती.  शूटिंगच्या निमित्तानं ती अनेकदा घरापासून दूर राहत होती.
advertisement
6/8
काल रात्री अभिनेत्री सुबाषिनी रात्री तिच्या नवऱ्याबरोबर व्हिडीओ कॉलवर बोलली. त्यानंतर तिनं आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. दोघांमध्ये काही कौटुंबिक वाद असल्याची माहिती समोर आली आहे. या वादातूनच तिनं आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे.
advertisement
7/8
अभिनेत्री सुबाषिनीच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सुभाषिनीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. तिच्या मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
advertisement
8/8
पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. अभिनेत्रीनं आत्महत्या का केली याचा शोध पोलीस घेत आहेत. अभिनेत्रीच्या कुटुंबियांची चौकशी केली जाणार आहे. दरम्यान या घटनेमुळे चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Actress Death : नवऱ्यासोबत Video Call वर बोलली, थोड्या वेळात होत्याचं नव्हतं; हाय TRP मालिकेच्या अभिनेत्रीनं आयुष्य संपवलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल