माय सुख! पहाटे 4 वाजताच सलमान खानची पोस्ट, तुफान VIRAL; चेहऱ्यावर भलताच आनंद, कुणासाठी?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Salman Khan : बॉलिवूडचा अभिनेता सलमान खानने पहाटे 4 वाजताच सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ज्यात त्याने काही फोटो शेअर केले आहेत. या पोस्टची कॅप्शनही खास आहे.
advertisement
1/9

पहाटे 4 वाजता काही लोकांच्या दिवसाची सुरुवात होते, तर काही साखरझोपेत असतात. अशाच या वेळेला बॉलिवूडचा दबंग, सलमान खानने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे ही पोस्ट तुफान व्हायरल होते आहे.
advertisement
2/9
सलमान खान या फोटोत व्हाइट शर्टमध्ये दिसतो आहे. त्याचा हा लूक त्याच्या ॲक्शन हिरोच्या प्रतिमेपेक्षा पूर्णपणे वेगळा, शांत आणि फ्रेश आहे आणि त्याच्यासोबत त्याचा पेट डॉग आहे.
advertisement
3/9
या फोटोंमध्ये सलमानच्या चेहऱ्यावरील हास्य स्पष्टपणे दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावरील या हावभावावरून त्याचा आनंद स्पष्टपणे दिसतो आहे. ज्याला कोणत्याही कॅप्शनची गरज नाही.
advertisement
4/9
कोणताही ग्लॅमर नाही, कोणतेही फिल्टर्स नाहीत, फक्त सलमान त्याच्या 'माय सुख'सोबत शांत क्षण घालवत आहे आणि चाहत्यांना त्याच्या पडद्यामागील आयुष्याची एक झलक दाखवत आहे.
advertisement
5/9
सलमानचे हे फोटो कोणत्याही फिल्म प्रमोशनपेक्षा किंवा जाहिरातींपेक्षा अधिक प्रभावी वाटत आहेत कारण ते सत्य दाखवत आहे.
advertisement
6/9
सलमान खानचा हा अंदाज, हे फोटो आणि हे क्षण त्याच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत. हार्ट इमोजींपासून ते 'भाईजान गोल्स'पर्यंत सलमानच्या या पोस्टवर चाहत्यांचं प्रेम कमेंट्समधून ओसंडून वाहत आहे. या फोटोला लाखो लाइक्स मिळाले आहेत.
advertisement
7/9
दरम्यान सलमानच्या फोटोप्रमाणेच या पोस्टच्या कॅप्शननेही लक्ष वेधलं आहे. सलमानने पोस्टला '3:55 माय सुख' असं कॅप्शन दिलं आहे.
advertisement
8/9
सलमानच्या या पोस्टच्या कॅप्शनमध्ये 3:55 ही कदाचित या क्षणाची किंवा पोस्टची वेळ आणि माय सुख हे कदाचित त्याच्या पेट डॉगचं नाव असावं.
advertisement
9/9
सलमानच्या कामाबाबत म्हणायचं तर आता त्याची मातृभूमी ही फिल्म येणार आहे. 17 एप्रिलला ती थिएटरलमध्ये रिलीज होणार आहे. त्यानंतर तो आणखी एका फिल्ममध्ये दिसणार आहे. सलमान याबाबत माहिती दिली आहे. पण फिल्मची माहिती त्याने दिलेली नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
माय सुख! पहाटे 4 वाजताच सलमान खानची पोस्ट, तुफान VIRAL; चेहऱ्यावर भलताच आनंद, कुणासाठी?