TRENDING:

Bigg Boss Marathi 6 : "विशाल असा हात लावतोय, जशी ती त्याची प्रॉपर्टी", टास्कदरम्यान विशालने नको तेच केलं, राखीही चवताळली

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Vishal Kotiyan Rakhi Sawant : बिग बॉस मराठी 6 च्या नवीन एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात विशालने राखीसोबत असं कृत्य केलं की सगळे शॉक झाले आहेत.
advertisement
1/7
"विशाल असा हात लावतोय, जशी ती त्याची प्रॉपर्टी", टास्कवेळी विशालने नको तेच केलं
बिग बॉस मराठी 6 च्या घरात आज शाळा भरली आहे. आता सदस्यांनी विद्यार्थी बनून राडा घातला आहे. यावेळी टास्क देण्यात आले तेव्हा विशाल कोटियनने राखी सावंतसोबत नको तेच केलं. ज्यामुळे ड्रामा क्वीनचा पारा चढला आहे. इतकंच नव्हे तर विशालचं ते कृत्य पाहून प्रेक्षकही भडकले आहेत.
advertisement
2/7
बिग बॉस मराठी 6 च्या नव्या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये गणिताचा तास असल्याचा उल्लेख आहे. गणिताच्या तासादरम्यान विद्यार्थी बनललेल्या सदस्यांनी तुफान राडा घातला आहे. टास्कदरम्यान विशालने राखीसोबत असं काही केलं की राखी भडकली.
advertisement
3/7
प्रोमोत तुम्ही पाहू शकता टास्कदरम्यान बॉल पाठीवरून नेले जात आहेत आणि या बॉल्ससाठी झटापट सुरू आहे. यावेळी विशाल राखीच्या मागून येतो आणि तिला तसाच उचलतो. तो स्विमिंग पूलजवळ तिला नेतो.
advertisement
4/7
विशाल बोलतो, 'अगली बार डाल दुंगा माँ कसम' म्हणजे तो तिला स्विमिंग पूलमध्ये फेकण्यासाठी नेतो पण तसं करत नाही आणि पुढच्या वेळी पाण्यात फेकेन अशी धमकी देतो.
advertisement
5/7
यानंतर राखीही चवताळते, विशाल ही लास्ट वॉर्निंग आहे, मला हात लावू नको, असं ती ठणकावून सांगते. तिला इतका राग आलेला असतो की शेवटी ती ज्या टेबलजवळ उभी आहे, तो टेबलही फेकून देते.
advertisement
6/7
विशालचं हे कृत्य प्रेक्षकांनाही आवडलं नाही आहे. एका युझरने, विशाल मुलींना अस हात लावतोय जशी की ती त्याची प्रॉपर्टी आहे', अशी कमेंट केली आहे.
advertisement
7/7
आता विशालने केलेल्या या कृत्यावर बिग बॉस काय बोलणार, विशालला याची शिक्षा मिळणार का? राखी आणि विशालमधील या राड्याचा घरातील वातावरणावर काय परिणाम होणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : "विशाल असा हात लावतोय, जशी ती त्याची प्रॉपर्टी", टास्कदरम्यान विशालने नको तेच केलं, राखीही चवताळली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल