TRENDING:

अये विशु... Bigg Boss वीनरच्या प्रेमात आकंठ बुडाली सौंदर्या, विशाल-मृगसीचे रोमँटिक फोटो

Last Updated:
advertisement
1/7
बिग बॉस वीनरच्या प्रेमात आकंठ बुडाली सौंदर्या, विशाल-मृगसीचे रोमँटिक फोटो
बिग बॉस मराठी 3 चा विजेता विशाल निकम त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. विशालने काही दिवसांआधीच त्याच्या सौंदर्याचा चेहरा आणि नाव चाहत्यांना दाखवला.
advertisement
2/7
अभिनेत्री अक्षया हिंदळकर म्हणजेच मृगसी ही विशालची गर्लफ्रेंड आहे. बिग बॉसमध्ये विशालने त्याची सौंदर्या अशी हिंट दिली होती. जवळपास 4-5 वर्षांनी विशालने त्याच्या गर्लफ्रेंडचा चेहरा आणि नाव सर्वांसमोर आणलं. 
advertisement
3/7
विशाल आणि मृगसीने अलीकडेच सोशल मीडियावर एक रोमँटिक सिनेमॅटिक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये दोघांची केमिस्ट्री, एकमेकांबद्दलचं प्रेम स्पष्टपणे दिसून आलं होतं. व्हिडीओ शेअर होताच तो चाहत्यांना आवडला. विशाल आणि अक्षयावर प्रेमाचा वर्षाव केला. 
advertisement
4/7
व्हिडीओनंतर आता विशाल आणि मृगसीने सनसेट फोटोशूट केलं आहे. दोघांचा रोमँटिक अंदाज या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे. या फोटोंमध्ये दोघंही एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे गुंतलेतहे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चाहत्यांकडून 'परफेक्ट कपल', 'मेड फॉर इच अदर', घरी जाऊन नजर काढा रे अशा अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
advertisement
5/7
या रोमँटिक फोटोंसोबत मृगसीने विशालसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. तिने लिहिलं आहे, "मुझमें मुझसे ज़्यादा है तू  (सखी). अये विशु मला तू खूप आवडतोस." 
advertisement
6/7
 सौंदर्या आणि विशाल आता प्रेमात आकंठ बुडालेले दिसत आहेत. विशाल आणि मृगसीचं लवकरच लग्न देखील करणार आहेत. त्यांच्या लग्नाची चाहते प्रतिक्षा करत आहेत. 
advertisement
7/7
विशाल आणि सौंदर्या यांनी साता जल्माच्या गाठी या स्टार प्रवाहवरील मालिकेत एकत्र काम केलं होतं. ही मालिका 2019 मध्ये टेलिकास्ट झाली होती. याच मालिकेच्या सेटवर दोघांचं प्रेम जुळलं. दोघांची लव्ह स्टोरी ऐकण्यासाठीही चाहते खूप उत्सुक आहेत. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
अये विशु... Bigg Boss वीनरच्या प्रेमात आकंठ बुडाली सौंदर्या, विशाल-मृगसीचे रोमँटिक फोटो
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल