TRENDING:

हॉलिवूडच्या 'त्या' एका कथेवर बॉलिवूडमध्ये बनले 4 चित्रपट; 3 डिझास्टर, तर एक सुपरहिट, तुम्ही पाहिला का?

Last Updated:
अनेकदा आपण एखादा चित्रपट पाहतो आणि आपल्याला वाटतं, "अरे, ही गोष्ट तर कुठेतरी ऐकल्यासारखी वाटतेय!" गाण्यांच्या बाबतीत देखील असंच होतं.
advertisement
1/8
'त्या' एका कथेवर बनले 4 चित्रपट; 3 डिझास्टर, तर एक 'सुपरहिट', तुम्ही पाहिला का?
आपल्या दैनंदिन आयुष्यात तुम्ही अनेकदा लोकांना असं बोलताना ऐकलं असेल की नक्कल करायलाही अक्कल लागते, जे अगदी बरोबर देखील आहे. विशेषतः जेव्हा आपण चित्रपटसृष्टीबद्दल बोलतो, तेव्हा ही म्हण तंतोतंत लागू पडते. अनेकदा आपण एखादा चित्रपट पाहतो आणि आपल्याला वाटतं, "अरे, ही गोष्ट तर कुठेतरी ऐकल्यासारखी वाटतेय!" गाण्यांच्या बाबतीत देखील असंच होतं. शिवाय बॉलिवूडमध्ये हॉलिवूडच्या चित्रपटांपासून प्रेरणा घेणं ही काही नवीन गोष्ट नाही. 60-70 च्या दशकातील 'नागिन' असो किंवा 'आराधना', अनेक हिट चित्रपटांची मुळं पश्चिमेकडच्या कथांमध्ये दडलेली आहेत.
advertisement
2/8
पण तुम्हाला माहीत आहे का? 90 च्या दशकात हॉलिवूडच्या एकाच ब्लॉकबस्टर चित्रपटावर आधारित बॉलिवूडमध्ये चक्क 4 चित्रपट बनले. धक्कादायक म्हणजे, एकाच स्टोरीलाईनवर आधारित असलेल्या या चारपैकी तीन चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले, पण एका चित्रपटाने मात्र इतिहास घडवला. चला तर मग, 'इनडीसेंट प्रपोजल' (Indecent Proposal) या हॉलिवूडपटाच्या भारतीय रिक्रिएशनची रंजक गोष्ट जाणून घेऊया.
advertisement
3/8
1. 'सौदा' (1995) 3 फेब्रुवारी 1995 रोजी 'सौदा' प्रदर्शित झाला. या चित्रपटात विकास भल्ला आणि नीलम कोठारी मुख्य भूमिकेत होते. हॉलिवूडच्या मूळ कथेनुसार, यात दोन तरुण आणि एक मुलगी असं त्रिकूट होतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हा चित्रपट आधी ऐश्वर्या रायला ऑफर झाला होता. 70 लाखांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने फक्त 70 लाखच कमावले आणि तो 'डिझास्टर' ठरला. या अपयशानंतर अभिनेता सुमित सहगलने चक्क अभिनयालाच रामराम ठोकला.
advertisement
4/8
2. 'कारोबार: द बिझनेस ऑफ लव्ह' (2000)राकेश रोशन यांनी अनिल कपूर, ऋषी कपूर आणि जुही चावला यांना घेऊन 'कारोबार' चित्रपट बनवला. आधी यात श्रीदेवी असणार होत्या, पण त्यांनी स्विमसूट घालण्यास आणि काही सीनला नकार दिल्याने जुही चावलाची एन्ट्री झाली. हा चित्रपट तब्बल 7 वर्षे रेंगाळला होता. जेव्हा तो प्रदर्शित झाला, तेव्हा ऋषी कपूर यांनी अभिनयातून निवृत्ती जाहीर केली होती. 6 कोटींच्या बजेटचा हा चित्रपट जेमतेम 2.7 कोटीच कमावू शकला.
advertisement
5/8
३. 'सौदा: द डील' (2005) 2005 मध्ये संजय कपूरने आपल्या भावाचा (अनिल कपूर) वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न केला. 'सौदा: द डील' मध्ये त्याने नकारात्मक भूमिका साकारली. पण प्रेक्षकांनी याही चित्रपटाला नाकारलं. 2.5 कोटींच्या बजेटचा हा चित्रपट फक्त 1.6 कोटींवरच थांबला.
advertisement
6/8
4. 'जुदाई' (1997)आता प्रश्न उरतो की, तीच कथा असताना 'जुदाई' सुपरहिट कशी झाली? तर याचं उत्तर आहे दिग्दर्शक एस. व्ही. कृष्णा रेड्डी आणि राज कंवर यांची चतुराई.मूळ हॉलिवूड कथेत एक श्रीमंत माणूस गरिबाच्या पत्नीला एका रात्रीसाठी 'खरेदी' करतो, अशी दोन मुले आणि एक मुलगी यांची कथा होती. पण 'जुदाई'मध्ये हे समीकरण बदलण्यात आलं. इथे एका पैशाच्या हपापलेल्या पत्नीने (श्रीदेवी) स्वतःच्या पतीला (अनिल कपूर) दुसऱ्या मुलीला (उर्मिला मातोंडकर) 'विकले' होते. हा भारतीय तडका प्रेक्षकांना भावला.
advertisement
7/8
जुदाईशी संबंधित काही खास गोष्टी:म्युझिक: 'मुझे एक पल चैन ना आए' हे गाणं तुफान गाजलं. नदीम-श्रवणचं संगीत आजही लोकांच्या ओठांवर आहे.अब्बा-डब्बा-झब्बा: उपासना सिंहचा हा डायलॉग आजही मीम्समध्ये वापरला जातो.बॉक्स ऑफिस: 6 कोटींत बनलेल्या या सिनेमाने जगभरात 28 कोटींची कमाई केली.याच नावाने 1980 मध्ये जितेंद्र आणि रेखा यांचाही एक सुपरहिट चित्रपट आला होता.
advertisement
8/8
कथा तीच होती, पण ती मांडण्याची पद्धत आणि भारतीय प्रेक्षकांच्या मानसिकतेनुसार केलेले बदल 'जुदाई'ला तारून नेणारे ठरले. बाकी तीन चित्रपटांनी हॉलिवूडची 'कॉपी' केली, तर जुदाईने त्या कथेचं 'भारतीयकरण' केलं, हाच या यशाचा मूळ मंत्र होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
हॉलिवूडच्या 'त्या' एका कथेवर बॉलिवूडमध्ये बनले 4 चित्रपट; 3 डिझास्टर, तर एक सुपरहिट, तुम्ही पाहिला का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल