'महाराष्ट्रासाठी एकत्र या', दादांच्या निधनानंतर दिग्गज अभिनेत्याची भावनिक साद, घेतली सुनेत्रा पवार आणि शरद पवारांची भेट
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Ajit Pawar: अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली असून, आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाच्या हालचालींना वेग आला आहे.
advertisement
1/8

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील अकाली निधनाने अवघा महाराष्ट्र सुन्न झाला आहे. दादांच्या जाण्याने निर्माण झालेली ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. मात्र, या दुःखद घटनेनंतर आता राज्याच्या राजकारणात एक मोठी हालचाल सुरू झाली आहे.
advertisement
2/8
अजितदादांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली असून, आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाच्या हालचालींना वेग आला आहे.
advertisement
3/8
प्रसिद्ध अभिनेते आणि राष्ट्रवादीचे समर्थक सयाजी शिंदे यांनी आज सुनेत्रा पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सयाजी शिंदे कमालीचे भावूक झाले होते.
advertisement
4/8
ते म्हणाले, "अजित दादांच्या जाण्याने महाराष्ट्र निःशब्द झालाय. नेमकं काय बोलावं, हेच सुचत नाहीये. मी आज वहिनींची आणि मोठ्या साहेबांची भेट घेतली. खरं तर, निवडणुकीच्या काळातच चर्चा झाली होती की आता आपण एकत्र येणार आहोत. आता फक्त औपचारिकता राहिली होती, पण त्याआधीच हे अघटित घडलं."
advertisement
5/8
सयाजी शिंदे यांनी पुढे एक महत्त्वाची साद घातली. ते म्हणाले, "दादांचा जो उमदा स्वभाव, निर्णय घेण्याचा स्वभाव पुन्हा महाराष्ट्रात यावा या दृष्टीने दादाचं स्वप्न पूर्ण व्हावं. आणि ताकद वाढवायची असेल तर दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं. यानिमित्ताने मला हे सांगावंसं वाटतं. झालेल्या दुःखावर आपण काही बोलू शकत नाही सध्या. कोणीच काही बोलू शकत नाही."
advertisement
6/8
अजितदादांच्या निधनानंतर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील गट पुन्हा एकत्र येण्याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा आहेत. त्यातच आमदार रोहित पवार यांनी येत्या १२ तारखेला एका पत्रकार परिषदेत मोठा खुलासा करणार असल्याचं जाहीर केल्याने सस्पेन्स वाढला आहे.
advertisement
7/8
दुसरीकडे, सुनील शेळके यांनीही सूचक विधान केलं आहे की, अजितदादांची यापूर्वीच शरद पवार आणि इतर नेत्यांशी विलीनीकरणाबाबत चर्चा झाली असावी. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, "ज्या नेत्याने मला ३०-४० वर्षे सांभाळलं, त्यांच्या निधनानंतर मी जे सत्य आहे तेच बोललो. जर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी जबाबदारीने पाऊल उचललं आणि पक्ष एकत्र आणला, तर ते व्हिलन कसे ठरू शकतात?"
advertisement
8/8
दादांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्यासाठी दोन्ही बाजूंनी नरमाईची भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे. पक्ष आणि पवार कुटुंब पुन्हा एकदा एकवटणार का? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. १२ फेब्रुवारीला होणारी पत्रकार परिषद या सर्व प्रश्नांची उत्तरं देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'महाराष्ट्रासाठी एकत्र या', दादांच्या निधनानंतर दिग्गज अभिनेत्याची भावनिक साद, घेतली सुनेत्रा पवार आणि शरद पवारांची भेट