75 मुलींना डेट, गर्लफ्रेंड प्रेग्नंट होताच घाईघाईत उरकलं लग्न, आता मिस इंडियासोबत संसार करतोय अभिनेता!
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Angad Bedi Birthday : लग्नाआधी अभित्याने तब्बल ७५ मुलींना डेट केलं होतं! त्याच्यासोबत असलेल्या काही मुली त्याच्यापेक्षा १० वर्षांनी मोठ्या होत्या.
advertisement
1/10

बॉलिवूड अभिनेता अंगद बेदी आज आपला ४२वा वाढदिवस साजरा करत आहे. ६ फेब्रुवारी १९८३ रोजी दिल्लीमध्ये जन्मलेला अंगद हा माजी भारतीय क्रिकेट कर्णधार बिशन सिंग बेदी यांचा मुलगा आहे.
advertisement
2/10
विशेष म्हणजे, अंगद अंडर-१९ क्रिकेट देखील खेळला आहे. मात्र, नंतर त्याने मॉडेलिंगमध्ये करिअर सुरू केलं आणि तो अभिनय क्षेत्राकडे वळला.
advertisement
3/10
अंगद बेदी अभिनेता आणि मॉडेल दोन्ही आहे. त्याने आपल्या करिअरची सुरुवात ‘काया तरण’ या चित्रपटातून केली, ज्याचे दिग्दर्शन शशि कुमार यांनी केले होते. यानंतर तो एन.एस. माधवन यांच्या मल्याळम चित्रपट ‘वानमारंगल वीझुंपोल’ (व्हेन द बिग ट्रीज फॉल) मध्ये झळकला.
advertisement
4/10
या चित्रपटातील त्याच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली. त्यानंतर त्याने 'फालतू', 'पिंक', 'डियर जिंदगी', 'टायगर जिंदा है' यांसारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं.
advertisement
5/10
अंगद बेदीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बरीच चर्चा झाली. त्याने १० मे २०१८ रोजी नेहा धूपियाशी लग्न केलं. दोघांनी अनेक वर्षं एकमेकांना डेट केलं आणि अखेर लग्नगाठ बांधली.
advertisement
6/10
विशेष म्हणजे, नेहा ही अंगदपेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे. लग्नानंतर काही महिन्यांतच नोव्हेंबर २०१८ मध्ये त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यामुळे त्यांच्या लग्नाबद्दल अनेक चर्चांना उधाण आलं होतं.
advertisement
7/10
एका मुलाखतीत अंगद बेदीने आपल्या खासगी आयुष्याबद्दल धक्कादायक खुलासे केले. नेहा धूपियाच्या ‘नो फिल्टर नेहा’ या शोमध्ये त्याने सांगितलं की, लग्नाआधी त्याने तब्बल ७५ मुलींना डेट केलं होतं! त्याने हेही सांगितलं की, त्याच्यासोबत असलेल्या काही मुली त्याच्यापेक्षा १० वर्षांनी मोठ्या होत्या.
advertisement
8/10
अंगद बेदीने सांगितलं की, तो खूप शिस्तप्रिय वातावरणात मोठा झाला आणि मुंबईत येईपर्यंत तो खूप लाजाळू स्वभावाचा होता. मात्र, मुंबईत आल्यानंतर त्याच्या आयुष्यात मोठे बदल झाले. त्याला नवीन मित्र भेटले, वेगवेगळ्या लोकांशी ओळख झाली आणि त्याने अनेक मुलींना डेटही केलं.
advertisement
9/10
अंगद बेदी आणि प्रसिद्ध क्रिकेटपटू युवराज सिंग हे बालपणापासून चांगले मित्र आहेत. दोघ एकत्र क्रिकेटही खेळले आहेत. मात्र, वेळेनुसार त्यांच्या नात्यात बरेच बदल झाले.
advertisement
10/10
अंगद बेदीचा हा प्रवास अभिनय, क्रिकेट आणि वैयक्तिक आयुष्याने भरलेला आहे. त्याच्या आयुष्यातील काही किस्से मनोरंजक असले तरी त्याने आपल्या मेहनतीने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
75 मुलींना डेट, गर्लफ्रेंड प्रेग्नंट होताच घाईघाईत उरकलं लग्न, आता मिस इंडियासोबत संसार करतोय अभिनेता!