TRENDING:

Dhurandhar 2 चा बॉक्स ऑफिसवर धुरळा, तिथे मालामाल झाला पाकिस्तानी कलाकार, कारण काय?

Last Updated:
Dhurandhar 2: संपूर्ण देशभरातून 'धुरंधर २' ला चांगला प्रतिसाद मिळत असून पहिल्या भागापेक्षाही फिल्मचा दुसरा भाग तुफान गाजणार अशी खात्री निर्माण झाली आहे.
advertisement
1/11
Dhurandhar 2 चा बॉक्स ऑफिसवर धुरळा, तिथे मालामाल झाला पाकिस्तानी कलाकार, कारण काय?
दिग्दर्शक आदित्य धरच्या 'धुरंधर २' ने पहिल्याच दिवशी १०२ कोटींची कमाई करत अनेक रेकॉर्ड्स मोडून काढले आहेत. पेड प्रिव्ह्यूची एकत्रित कमाई पाहता ही रक्कम तब्बल १४५ कोटी इतकी आहे.
advertisement
2/11
संपूर्ण देशभरातून 'धुरंधर २' ला चांगला प्रतिसाद मिळत असून पहिल्या भागापेक्षाही फिल्मचा दुसरा भाग तुफान गाजणार अशी खात्री निर्माण झाली आहे.
advertisement
3/11
अशातच या सिनेमाशी संबंधित अनेक बातम्या सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. एका बातमीनुसार, धुरंधरच्या पहिल्या भागामुळे चक्क पाकिस्तानातील एक सिंगर मालामाल झाला आहे.
advertisement
4/11
धुरंधर हा सिनेमा २०२५ सालातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. इतकंच काय, तर या चित्रपटातील गाण्यांनीही प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं. या फिल्ममध्ये अनेक जुन्या आणि गाजलेल्या गाण्यांना वेगळ्या रुपात प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आलं होतं.
advertisement
5/11
ऐंशीच्या दशकात ज्या गाण्याने गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांना वेड लावलं होतं, ते 'हवा हवा' गाणं आजही तितकंच लोकप्रिय ठरलं आहे. या ब्लॉकबस्टर सिनेमात संजय दत्तच्या दमदार एन्ट्रीसाठी हे गाणं वापरण्यात आलं. पण हे गाणं वापरण्यासाठी निर्मात्यांना मोठी किंमत मोजावी लागली आहे.
advertisement
6/11
या गाण्याचे पाकिस्तानी गायक हसन जहांगीर यांनी एका मुलाखतीत याबाबत मोठा खुलासा केला आहे. ते म्हणाले, नुकतंच एक ३०० कोटींच्या बजेटचा सिनेमा आला, ज्याने ११०० कोटींहून अधिक कमाई केली. त्या चित्रपटाच्या निर्मात्यांनी 'हवा हवा' गाण्याचे हक्क मिळवण्यासाठी मला ५०,००० डॉलर्स दिले."
advertisement
7/11
हसन यांनी या सिनेमाचं नाव घेतलं नसलं, तरीही प्रेक्षकांना बरोबर कळलंय की हा सिनेमा कोणता आहे. केवळ दोन मिनिटांच्या गाण्यासाठी या गायकाला तब्बल ५०,००० डॉलर्स म्हणजेच जवळपास ४५ ते ४७ लाख रुपये मिळाले आहेत.
advertisement
8/11
'धुरंधर' या स्पाय-थ्रिलर सिनेमात संजय दत्तने 'एसपी अस्लम चौधरी' ही भूमिका साकारली आहे. त्याच्या एन्ट्री सीनसाठी जेव्हा 'हवा हवा'चे बीट्स वाजले, तेव्हा थिएटरमध्ये शिट्ट्यांचा पाऊस पडला होता.
advertisement
9/11
हसन जहांगीर यांनी सांगितलं की, पूर्वी गाण्यांच्या हक्काबाबत इतकी जागरूकता नव्हती. पण आता निर्माते अधिकृत परवानगी घेतात आणि योग्य मोबदलाही देतात. विशेष म्हणजे, हे गाणं १९८६ मध्ये रेकॉर्ड झालं होतं आणि १९८७ मध्ये रिलीज असलं, तरी आजही नव्या पिढीमध्ये या गाण्याची क्रेझ कायम आहे.
advertisement
10/11
केवळ 'हवा हवा'च नाही, तर 'धुरंधर'मध्ये जुन्या गाण्यांचा जणू खजिनाच वापरण्यात आला आहे. 'ना तो कारवां की तलाश है', उषा उथुप यांचं 'रंभा हो', आणि 'पिया तू अब तो आजा' या गाण्यांनी सिनेमाच्या कथानकाला एक वेगळीच उंची दिली आहे.
advertisement
11/11
धुरंधरची कथा भारत-पाकिस्तानमधील गुप्तहेरांच्या संघर्षावर आधारित असून, यात १९९९ चं विमान हायजॅक आणि २००८ च्या मुंबई हल्ल्यासारख्या ऐतिहासिक घटनांचा संदर्भ देण्यात आला आहे. अशातच आता धुरंधर २ मध्ये ही कथा पुढे सरकणार असून दोन देशातील आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी या फिल्ममध्ये दाखवण्यात येणार आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Dhurandhar 2 चा बॉक्स ऑफिसवर धुरळा, तिथे मालामाल झाला पाकिस्तानी कलाकार, कारण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल