TRENDING:

Dhurandhar: प्रत्येक सीननंतर अक्षय खन्ना लावायचा ऑक्सिजन मास्क, 25 सेकंदाच्या एन्ट्रीसाठी लावली प्राणाची बाजी, पण नेमकं काय घडलेलं?

Last Updated:
Akshaye Khanna:अभिनेता अक्षय खन्नाच्या 'धुरंधर' चित्रपटातील एन्ट्रीने सध्या सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला आहे. मात्र, पडद्यावर जेवढा सहज आणि धमाकेदार दिसतो, तो सीन शूट करताना अक्षय खन्नाला एका मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला आहे.
advertisement
1/7
प्रत्येक सीननंतर अक्षय खन्ना लावायचा ऑक्सिजन मास्क, पण नेमकं काय घडलेलं?
मुंबई: अभिनेता अक्षय खन्नाच्या 'धुरंधर' चित्रपटातील एन्ट्रीने सध्या सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला आहे. 'रहमान डकैत' ची भूमिका आणि 'FA9LA' या धमाकेदार गाण्यावरील त्याची एन्ट्री बघून चाहते अक्षरशः वेडे झाले आहेत.
advertisement
2/7
मात्र, पडद्यावर जेवढा सहज आणि धमाकेदार दिसतो, तो सीन शूट करताना अक्षय खन्नाला एका मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला, याचा खुलासा चित्रपटाचे कोरिओग्राफर विजय गांगुली यांनी केला आहे.
advertisement
3/7
बहरीनचा हिप-हॉप आर्टिस्ट फ्लिप्पराची याने तयार केलेले 'FA9LA' हे गाणे इंटरनेटवर ट्रेंड करत आहे. परंतु, हा थ्रिलिंग सीन लेह-लडाखच्या उंच पर्वतांवर शूट करण्यात आला आहे.
advertisement
4/7
मिड-डेला दिलेल्या मुलाखतीत विजय गांगुली यांनी सांगितले की, उंचीवर ऑक्सिजनची पातळी कमी असल्यामुळे अक्षय खन्नाला शूटिंगदरम्यान खूप त्रास झाला. त्यांनी सांगितले की, "अक्षय प्रत्येक शॉट झाल्यानंतर लगेच ऑक्सिजन मास्क लावायचा आणि एक छोटा ऑक्सिजन सिलेंडर सोबत घेऊन फिरायचा." अक्षयने कोणत्याही तक्रारीशिवाय, न थांबता तो सिक्वेन्स पूर्ण केला, असे गांगुली यांनी सांगितले.
advertisement
5/7
विजय गांगुली यांनी या गाण्याच्या संकल्पनेबद्दल बोलताना सांगितले की, हा सीन 'शेर-ए-बलोच' म्हणून रहमान डकैतचा राज्याभिषेक साजरा करतो. अक्षय खन्नाला खरंतर फक्त डान्सर्समधून चालत येऊन सिंहासनावर बसायचे होते.
advertisement
6/7
पण सीनचा मूड आणि डान्सर्सचा परफॉर्मन्स पाहून अक्षयने स्वतःच सांगितले की, तो चालताना थोडा डान्स करेल. तो काय करणार आहे, हे कोणालाच माहीत नव्हते, असे विजय गांगुली म्हणाले. अक्षयने सेटवर येऊन डान्स केला आणि तो सीन मास्टरपीस ठरला!
advertisement
7/7
अशा आव्हानात्मक परिस्थितीतही अक्षय खन्नाच्या प्रोफेश्नलिजममुळे टीमने हे संपूर्ण गाणे फक्त दोन तासांत शूट केले. दिग्दर्शक आदित्य धर यांच्या या चित्रपटात रणवीर सिंग, अर्जुन रामपाल, आर. माधवन, संजय दत्त आणि सारा अर्जुन यांसारखे दिग्गज कलाकार आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Dhurandhar: प्रत्येक सीननंतर अक्षय खन्ना लावायचा ऑक्सिजन मास्क, 25 सेकंदाच्या एन्ट्रीसाठी लावली प्राणाची बाजी, पण नेमकं काय घडलेलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल