TRENDING:

Team India : रोहितने बेंचवर बसवलं, मनात नसतानाही सूर्याने खेळवलं, वर्ल्ड कप डेब्यूमध्ये स्टार फेल!

Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये युएसएविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा विजय झाला, त्यानंतर नामिबियाविरुद्धच्या सामन्यात भारतीय टीममध्ये दोन बदल करण्यात आले आहेत.
advertisement
1/9
रोहितने बेंचवर बसवलं, मनात नसतानाही सूर्याने खेळवलं, वर्ल्ड कप डेब्यूमध्ये फेल!
नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममधल्या या सामन्यात नामिबियाने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, त्यानंतर भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टीममध्ये दोन बदल केल्याचं सांगितलं.
advertisement
2/9
अभिषेक शर्मा अजूनही आजारी असून तो एक-दोन मॅच खेळू शकणार नाही, तर बुमराह फिट झाल्यामुळे सिराजला बाहेर बसावं लागत असल्याचं सूर्यकुमार यादव टॉसवेळी म्हणाला. अभिषेक शर्माच्या ऐवजी संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली.
advertisement
3/9
संजू सॅमसनच्या करिअरमधला हा पहिलाच वर्ल्ड कपचा सामना आहे. वर्ल्ड कपमध्ये पदार्पण करणारा संजू सॅमसन हा भारताचा दुसरा वयस्कर खेळाडू ठरला आहे. नामिबियाविरुद्धच्या सामन्यात संजूचं वय 31 वर्ष 93 दिवस आहे.
advertisement
4/9
अमित मिश्रा हा वर्ल्ड कपमध्ये पदार्पण करणारा भारताचा सगळ्यात वयस्कर खेळाडू होता. 2014 साली पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अमित मिश्राने वर्ल्ड कप पदार्पण केलं, तेव्हा त्याचं वय 31 वर्ष 117 दिवस होतं.
advertisement
5/9
संजू सॅमसन हा 2024 साली झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्येही भारतीय टीममध्ये होता, पण रोहित शर्माने त्याला एकाही सामन्यात संधी दिली नाही. यानंतर आता या टी-20 वर्ल्ड कपमध्ये सूर्यकुमार यादवसाठीही संजू पहिल्या पसंतीचा खेळाडू नव्हता.
advertisement
6/9
अभिषेक शर्मा आजारी असल्यामुळे संजू सॅमसनचं नशीब चमकलं आणि त्याला पहिल्यांदाच वर्ल्ड कपचा सामना खेळण्याची संधी मिळाली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजपर्यंत संजू टीम इंडियाचा पहिल्या पसंतीचा ओपनर होता, पण त्याची कामगिरी निराशाजनक झाली.
advertisement
7/9
न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजवेळी इशान किशनला टीममध्ये आणलं गेलं, यानंतर इशानने खणखणीत बॅटिंग करत टीममधलं स्वत:चं स्थान पक्कं केलं. त्यामुळे संजूला बाहेर बसावं लागलं, पण आता अभिषेकच्या गैरहजेरीमध्ये संजूला स्वत:ला सिद्ध करण्याची आणखी एक संधी मिळाली.
advertisement
8/9
सूर्यकुमार यादवने दिलेल्या या संधीचं सोनं संजूला करता आलं नाही. 8 बॉलमध्ये 22 रन करून संजू आऊट झाला. त्याच्या या खेळीमध्ये 3 सिक्स आणि एका फोरचा समावेश होता.
advertisement
9/9
भारताची प्लेइंग इलेव्हन : संजू सॅमसन, इशान किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Team India : रोहितने बेंचवर बसवलं, मनात नसतानाही सूर्याने खेळवलं, वर्ल्ड कप डेब्यूमध्ये स्टार फेल!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल