Mumbai : UTS ॲप बंद, पण तुमच्या आर-वॉलेटमधील पैशांचं काय? जाणून घ्या सविस्तर
Last Updated:
R-Wallet Balance Transfer To RailOne App : लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.नक्की काय माहिती समोर आलेली आहे ती सविस्तर जाणून घ्या.
advertisement
1/7

दररोज रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. रेल्वेचे UTS मोबाईल अॅप 1 मार्चपासून बंद करण्यात येणार आहे.
advertisement
2/7
रेल्वे प्रशासनाने जारी केलेल्या सुचनेनुसार यापुढे तिकीट बुकिंग आणि इतर सर्व प्रवासी सेवांसाठी फक्त रेलवन हेच अधिकृत अॅप वापरावे लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी कोणतीही अडचण टाळण्यासाठी लवकरात लवकर रेलवन अॅप डाउनलोड करून वापरण्यास सुरुवात करावी असे आवाहन रेल्वेने केले आहे.
advertisement
3/7
युटीएस अॅपचे नवीन व्हर्जन अपडेट केल्यानंतर प्लॅटफॉर्म तिकीट काढणे किंवा R-Wallet रिचार्ज करणे शक्य होणार नाही. मात्र, रेल्वेने स्पष्ट केले आहे की युटीएस अॅपमध्ये असलेली R-Walletची शिल्लक पूर्णपणे सुरक्षित राहील. ही रक्कम रेलवन अॅपवर सहज वापरता येईल.
advertisement
4/7
नवीन रेलवन अॅपमध्ये आरक्षित, अनारक्षित आणि प्लॅटफॉर्म तिकिटे एकाच ठिकाणी उपलब्ध असतील. पेमेंटसाठी UPI, डेबिट,क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग आणि R-Walletचे पर्याय असतील.
advertisement
5/7
याशिवाय ट्रेनची लाईव्ह स्थिती, विलंब, कोच आणि प्लॅटफॉर्मची माहिती, पीएनआर स्टेटस तपासणे, तिकीट रद्द करणे आणि रिफंड ट्रॅक करणे या सुविधा मिळतील.
advertisement
6/7
या नव्या अॅपमध्ये प्रवाशांसाठी IRCTC मान्यताप्राप्त विक्रेत्यांकडून जेवण ऑर्डर करण्याची आणि रेलमदतद्वारे तक्रार नोंदवण्याची सोयही उपलब्ध असेल.
advertisement
7/7
युटीएस अॅपची सुरुवात 27 डिसेंबर 2014 रोजी झाली. पहिल्यांदा मुंबई उपनगरीय रेल्वेमध्ये ते सुरू झाले आणि नंतर देशातील प्रमुख शहरांमध्ये विस्तार झाला.2018 पासून इंटर-झोनल प्रवासासाठीही ही सुविधा उपलब्ध झाली होती. आता रेलवन हेच नवीन अधिकृत अॅप असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai : UTS ॲप बंद, पण तुमच्या आर-वॉलेटमधील पैशांचं काय? जाणून घ्या सविस्तर