अभिषेक मल्हानसोबत साखरपुड्याच्या अफवा, जिया शंकरने शेअर केला मिस्ट्री-मॅनसोबतचा रोमँटिक फोटो, म्हणते '२०२५ मध्येच...'
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Jiya Shankar Boyfriend: ३० डिसेंबरच्या रात्री जियाने एक असा फोटो शेअर केला, ज्याने सर्व चर्चांना एका झटक्यात पूर्णविराम दिला आहे. जियाच्या आयुष्यात अभिषेक नाही, तर कोणीतरी वेगळाच मिस्ट्री मॅन' असल्याची कबुली तिने या पोस्टद्वारे दिली आहे.
advertisement
1/7

मुंबई: सोशल मीडियावर अफवांचा बाजार कधी उठेल, याचा नेम नसतो. 'बिग बॉस OTT २' मध्ये एकत्र दिसलेली जोडी म्हणजेच अभिषेक मल्हान उर्फ फुकरा इंसान आणि अभिनेत्री जिया शंकर यांच्याबद्दल अनेक अफवा पसरल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून लग्नाच्या आणि साखरपुड्याच्या बातम्यांनी जोर धरला होता.
advertisement
2/7
मात्र, ३० डिसेंबरच्या रात्री जियाने एक असा फोटो शेअर केला, ज्याने या सर्व चर्चांना एका झटक्यात पूर्णविराम दिला आहे. जियाच्या आयुष्यात अभिषेक नाही, तर कोणीतरी वेगळाच मिस्ट्री मॅन' असल्याची कबुली तिने या पोस्टद्वारे दिली आहे.
advertisement
3/7
जियाने तिच्या इंस्टाग्रामवर एक अत्यंत रोमँटिक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये एक तरुण जियाच्या कपाळावर किस घेताना दिसत आहे. जियाने त्या तरुणाचा चेहरा एका लाल रंगाच्या हार्ट इमोजीने लपवला असला, तरी या फोटोमध्ये असलेला मुलगा तिचा बॉयफ्रेंड असल्याचं स्पष्ट होतंय.
advertisement
4/7
हा फोटो शेअर करताना तिने लिहिलेलं कॅप्शन अधिक बोलकं आहे. तिने लिहिलंय, "चला, या खोट्या अफवांना २०२५ मध्येच सोडून देऊया." या एका वाक्यातून तिने हे स्पष्ट केलंय की, अभिषेक मल्हानसोबत तिचं नाव जोडणं ही केवळ एक अफवा होती. तिचा साखरपुडा झालेला नाही आणि ती अभिषेकसोबत रिलेशनशिपमध्ये देखील नाही.
advertisement
5/7
काही दिवसांपूर्वी 'टेली खजाना' सारख्या पोर्टल्सनी असा दावा केला होता की, जिया आणि अभिषेकने आपलं नातं अधिकृत केलं आहे आणि ते लवकरच लग्न करणार आहेत. या बातम्यांमुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं, पण जियाच्या नव्या पोस्टने या आनंदावर विरजण पडलं आहे. खरं तर, 'बिग बॉस'च्या घराबाहेर आल्यानंतर या दोघांमधील मैत्रीतही दुरावा आला होता. इतकंच नाही, तर त्यांनी एकमेकांना सोशल मीडियावर ब्लॉकही केलं होतं.
advertisement
6/7
अभिषेकच्या चाहत्यांनी जियाला आणि तिच्या आईला सोशल मीडियावर ट्रोल केल्यामुळे जिया प्रचंड संतापली होती. तिने स्पष्टपणे सांगितलं होतं की, "मी आणि अभिषेक कधीही मित्राहून अधिक काही नव्हतो." युट्युबरच्या चाहत्यांनी आपल्या आणि आईच्या नावाचा वापर चुकीच्या पद्धतीने करू नये, असा इशाराही तिने दिला होता.
advertisement
7/7
जिया शंकरने वर्षाच्या शेवटी हे गुपित उघड करून एक प्रकारे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. आता तो 'मिस्ट्री मॅन' नक्की कोण आहे? तो बॉलिवूडमधील आहे की बिझनेसमन? हे जाणून घेण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
अभिषेक मल्हानसोबत साखरपुड्याच्या अफवा, जिया शंकरने शेअर केला मिस्ट्री-मॅनसोबतचा रोमँटिक फोटो, म्हणते '२०२५ मध्येच...'