TRENDING:

Camera : फक्त फोटो काढत नाही, तुमच्या फोनमधील कॅमेरा आता करतो ही महत्वाची काम, तुम्हाला हे माहितीय का?

Last Updated:
तुम्ही कधी विचार केला आहे का की, तुमच्या फोनमध्ये बसवलेली ही छोटीशी भिंगं केवळ फोटोग्राफीसाठीच आहेत का? अनेकांना या कॅमेराचं फोटोशिवाय दुसरं काम माहितच नाहीय.
advertisement
1/7
फक्त फोटो काढत नाही, तुमच्या फोनमधील कॅमेरा आता करतो ही महत्वाची काम
आजच्या काळात आपल्यापैकी कोणाकडेही स्मार्टफोन असला की, आपण सर्वात आधी काय चेक करतो? तर त्याचा 'कॅमेरा'. फिरायला गेल्यावर निसर्गाचे फोटो काढणे असो, हॉटेलमध्ये आल्यावर जेवणाचे फोटो असो किंवा स्वतःचे सुंदर सेल्फी. त्यामुळे चांगले फोटो किंवा चांगला कॅमेरा हे फीचर तर फोनमध्ये हवंच पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की, तुमच्या फोनमध्ये बसवलेली ही छोटीशी भिंगं केवळ फोटोग्राफीसाठीच आहेत का? अनेकांना या कॅमेराचं फोटोशिवाय दुसरं काम माहितच नाहीय.
advertisement
2/7
खरं तर, तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आज तुमचा स्मार्टफोन कॅमेरा एका 'स्मार्ट डोळ्या'सारखा काम करू लागला आहे. फोटो आणि व्हिडिओच्या पलीकडे जाऊन कॅमेरा तुमचे रोजचे आयुष्य किती सोपं करू शकतो, हे जाणून घेतल्यावर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल.
advertisement
3/7
1. तुमचा वैयक्तिक 'AI' सल्लागारआजकल 'ChatGPT' आणि 'Google Gemini' सारखे एआय (AI) चॅटबॉट्स खूप लोकप्रिय झाले आहेत. या ॲप्समध्ये आता 'लाईव्ह कॅमेरा शेअरिंग' चं फीचर मिळतं. समजा तुम्ही शॉपिंगला गेला आहात आणि तुम्हाला एखादा ड्रेस आवडला, पण तो तुम्हाला शोभेल की नाही यात शंका आहे? तर फक्त कॅमेरा ऑन करून एआयला विचारा. तो व्हिज्युअल कॉन्टेक्स्ट पाहून तुम्हाला लगेच फॅशन टिप्स किंवा सजेशन्स देऊ शकतो.
advertisement
4/7
2. जर तुम्ही परदेशात किंवा दुसऱ्या राज्यात फिरायला गेलात आणि तिथली भाषा तुम्हाला समजत नसेल, तर घाबरण्याचं कारण नाही. तुमच्या फोनचा कॅमेरा ओपन करा आणि गुगल ट्रान्सलेटच्या मदतीने तिथले साईन बोर्ड, हॉटेलचं मेनू कार्ड किंवा कागद स्कॅन करा. तुमचा कॅमेरा काही सेकंदात त्या परक्या भाषेचं तुमच्या मातृभाषेत रूपांतर करेल. पर्यकांसाठी हे वरदानच आहे.
advertisement
5/7
3. गुगल लेन्स: विचारण्यापेक्षा 'पाहून' शोधारस्त्याने चालताना तुम्हाला एखादं सुंदर फूल दिसलं किंवा एखाद्याच्या हातातील घड्याळ आवडलं, पण त्याचं नाव माहीत नाही? अशा वेळी फक्त 'Google Lens' ओपन करा आणि त्या वस्तूवर कॅमेरा धरा. इंटरनेटवर त्या वस्तूशी संबंधित सर्व माहिती, तिचं नाव आणि ती कुठे विकत मिळेल याची लिंक तुमच्या स्क्रीनवर हजर असेल. म्हणजेच, आता शोधण्यासाठी टाईप करण्याची गरज नाही, फक्त 'कॅमेरा' पुरेसा आहे.
advertisement
6/7
4. खिशातील 'डिजिटल' स्कॅनरतो काळ आता गेला जेव्हा कागदपत्रं स्कॅन करण्यासाठी मोठ्या स्कॅनर मशीनची गरज पडायची. आता तुमच्याकडे स्मार्टफोन असताना दुकानात जाण्याची गरज नाही. कागद कॅमेऱ्यासमोर धरा आणि विविध स्कॅनिंग ॲप्सच्या मदतीने (उदा. Adobe Scan किंवा Google Drive) त्याचे सुंदर PDF मध्ये रूपांतर करा. हे स्कॅन केलेले डॉक्युमेंट्स तुम्ही एडिट करू शकता आणि ई-मेलवरही पाठवू शकता.
advertisement
7/7
स्मार्टफोनचा कॅमेरा हे केवळ आता फोटो व्हिडीओ काढण्यासाठी राहिलं नाही, तर ते उत्पादकता वाढवणारं एक शक्तिशाली यंत्र आहे. जर तुम्ही याचा वापर फक्त फोटो काढण्यासाठी करत असाल, तर तुम्ही एका मोठ्या सुविधेला मुकत आहात. त्यामुळे पुढच्या वेळी कॅमेरा उघडाल, तेव्हा या भन्नाट गोष्टी नक्की करून पहा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Camera : फक्त फोटो काढत नाही, तुमच्या फोनमधील कॅमेरा आता करतो ही महत्वाची काम, तुम्हाला हे माहितीय का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल