TRENDING:

'त्या व्यक्तीने मला प्रायव्हेट पार्ट दाखवला', राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्रीचा लैंगिक छळ, सांगितला 'तो' भयावह प्रसंग

Last Updated:
Famous Actress Faced Harassment : प्रसिद्ध अभिनेत्रीला लैंगिक छळाचा सामना करावा लागला होता. अभिनेत्रीने नुकतंच एका मुलाखतीत याबाबत भाष्य केलं आहे.
advertisement
1/7
'त्या व्यक्तीने मला प्रायव्हेट पार्ट दाखवला', अभिनेत्रीचा लैंगिक छळ
दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री पार्वती थिरुवोथु (Parvathy Thiruvothu) सध्या चर्चेत आहे. अभिनेत्रीने नुकतंच एका मुलाखतीत लैंगिक छळाचा सामना करावा लागला असल्याचं सांगितलं आहे. 'द मेल फेमिनिस्ट' या पॉडकास्टमध्ये तिने मोकळेपणाने भाष्य केलं आहे.
advertisement
2/7
पार्वती थिरुवोथुला लहानपणापासूनच छेडछाड आणि लैंगिक छळाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे या गोष्टीचा तिच्या मनावर आणि शरीरावर खोल परिणाम झाला होता.
advertisement
3/7
पार्वती थिरुवोथूने या पॉडकास्टमध्ये सांगितले की, लहानपणापासूनच अनोळखी लोकांकडून तिला त्रास सहन करावा लागला. या घटना इतक्या भयानक होत्या की त्यांचा तिच्या आयुष्यावर दीर्घकाळ परिणाम झाला. “कोणत्याही मुलाने अशा आठवणी घेऊन मोठे होता कामा नये,” असेही अभिनेत्री म्हणाली.
advertisement
4/7
पार्वतीने सांगितले की, तिच्या बालपणी अनेकदा तिच्यासोबत गैरवर्तन झाले. कधी ऑटोरिक्षात बसताना कुणी चिमटा काढला, तर कधी रेल्वे स्टेशनवर आईला सोडून वडिलांसोबत परत येत असताना एका अनोळखी व्यक्तीने तिच्या छातीवर जोरात हात मारला आणि पळ काढला. तो फक्त स्पर्श नव्हता, इतका जोरात मारले गेले की ती वेदनेने किंचाळली. त्या वेळी ती फारच लहान होती आणि नेमके काय घडते आहे हे तिला कळत नव्हते, पण भीती आणि वेदना आजही तिला स्पष्ट आठवतात.
advertisement
5/7
पार्वतीने हेही सांगितले की अनेक वेळा रस्त्यावर चालताना काही पुरुषांनी तिला आपले प्रायव्हेट पार्ट दाखवून त्रास दिला. त्या वयात हे किती चुकीचे आणि धोकादायक आहे हे तिला समजत नव्हते, पण नंतर लक्षात आले की या घटनांचा तिच्या शरीरावर आणि मनावर खोल परिणाम झाला.
advertisement
6/7
भावूक होत पार्वती म्हणाली,"आपण जन्माला येतो आणि त्यानंतर आपलं शोषण सुरू होतं". ही गोष्ट ऐकून मन हेलावून जाते, कारण लहान मुलींना इतक्या लवकर अशा वास्तवाला सामोरे जावे लागते.
advertisement
7/7
पार्वतीने मल्याळम, तमिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘टेक ऑफ’, ‘उयिरे’, ‘करीब करीब सिंगल’, ‘चार्ली’, ‘मरियन’ आणि ‘बंगलोर डेज’ हे तिचे काही लोकप्रिय चित्रपट आहेत. तिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला असून ती नेहमीच सशक्त भूमिका साकारण्यासाठी ओळखली जाते. ‘द स्टॉर्म’ या वेब सीरिजमध्ये झळकणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'त्या व्यक्तीने मला प्रायव्हेट पार्ट दाखवला', राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्रीचा लैंगिक छळ, सांगितला 'तो' भयावह प्रसंग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल