दिवाकर पांडुरंग पंचवाडकर (७३) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २७ नोव्हेंबर ते २९ डिसेंबर २०२५ दरम्यान हा प्रकार घडला. संशयित आरोपींनी फिर्यादीला व्हॉट्सॲपवर फोन करून आपण वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याचे सांगितले. "तुमच्या नावावर एका मोठ्या फ्रॉड केसमध्ये गुन्हा दाखल झाला असून तुम्हाला लवकरच अटक केली जाईल," अशी भीती त्यांनी घातली. विश्वास बसावा यासाठी त्यांनी काही बनावट कागदपत्रेही पाठवली.
advertisement
तुम्हीही इन्स्टा व्हिडीओ डाउनलोड करता? जरा थांबा, पुण्यातील विकृताला थेट पोलिसांनी घडवली अद्दल
तपासातून सुटका हवी असल्यास पैसे द्यावे लागतील, असे सांगून आरोपींनी वृद्धाला 'डिजिटल अरेस्ट' केलं. घाबरलेल्या पंचवाडकर यांनी आरोपींनी सांगितलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण ३४ लाख ८० हजार २०० रुपये जमा केले.
अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. तळेगाव दाभाडे पोलिसांनी अज्ञात व्हॉट्सॲप क्रमांकधारक आणि संबंधित बँक खातेधारकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून ही लूट केल्याने सायबर सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे.
