TRENDING:

'तुझी ऐशी तैशी करू...', रणवीर सिंगला गँगस्टरची खतरनाक धमकी, ऑडिओ नोटमधील एक-एक ओळ आली समोर

Last Updated:
Ranveer Singh received death threats: कुप्रसिद्ध गँगस्टरची एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर वणव्यासारखी पसरली असून, यामध्ये त्याने रणवीर सिंगला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
advertisement
1/7
रणवीर सिंगला गँगस्टरची खतरनाक धमकी, ऑडिओ नोटमधील एक-एक ओळ आली समोर
मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या एका मोठ्या संकटात सापडला आहे. कुप्रसिद्ध गँगस्टर हॅरी बॉक्सर याची एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर वणव्यासारखी पसरली असून, यामध्ये त्याने रणवीर सिंगला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
advertisement
2/7
ही धमकीची व्हॉइस नोट रणवीरच्या मॅनेजरला पाठवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या ऑडिओ क्लिपमुळे सिनेसृष्टीत पुन्हा एकदा भीतीचं वातावरण पसरलं असून, गँगस्टरने केवळ रणवीरलाच नाही तर संपूर्ण बॉलिवूडला लाईनवर येण्याचा इशारा दिला आहे.
advertisement
3/7
हॅरी बॉक्सरने पाठवलेल्या या व्हॉइस नोटमध्ये रणवीरच्या खासगी आयुष्याबद्दल आणि त्याच्या हालचालींबद्दल माहिती असल्याचा दावा केला आहे. गँगस्टरने अत्यंत जहाल भाषेत म्हटलं आहे, "रणवीर सिंग, तुला खूप खुमखुमी होती ना? तू रोहितला पोलीस स्टेशनला जाण्याचा सल्ला दिलास आणि स्वतःही गेलास. आता बघ तुझी ऐशी-तैशी कशी करतो ते. तुझ्याकडे कामं कारण्याचे सगळे डिटेल्स आहेत आमच्याकडे; तू कुठे राहतो, कधी कुठे जातो. तू बोललास एक आणि केलास दुसरंच, आता तुला त्याची शिक्षा नक्की मिळेल."
advertisement
4/7
इतकंच नाही तर, गँगस्टरने संपूर्ण बॉलिवूडलाच आव्हान दिलंय. "सगळ्या इंडस्ट्रीला सांगतोय, वेळेत लाईनवर या, नाहीतर तुमची अक्कल ठिकाण्यावर आणू. आम्ही कधीही तुमच्या दारावर ठकठक करू."
advertisement
5/7
या ऑडिओ क्लिपमध्ये हॅरी बॉक्सरने पोर्तुगालमध्ये झालेल्या एका गोळीबाराची जबाबदारीही स्वीकारली आहे. तो म्हणतो की, त्याने आणि सुनील मीराने मिळून सुखदेव जावंदाच्या दुकानावर गोळीबार केला आहे.
advertisement
6/7
"तो भारतीय लोकांना कामावर ठेवतो, पण पैसे देत नाही आणि पासपोर्टही लपवून ठेवतो. आता फक्त ट्रेलर दाखवलाय, पुढच्या वेळी थेट डोक्यात गोळी घालू," अशा शब्दांत गँगस्टरने आपल्या दहशतीचा पुरावा दिला आहे.
advertisement
7/7
गँगस्टरने रणवीरला बजावलं आहे की, पोलिसांकडे जाऊन काहीही फायदा होणार नाही. उलट, पोलिसांकडे गेल्यामुळे गँगचा राग अधिक वाढेल आणि परिणाम गंभीर होतील, असा इशारा त्याने दिला आहे. रणवीरच्या मॅनेजरला ही क्लिप मिळाल्यापासून त्याच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'तुझी ऐशी तैशी करू...', रणवीर सिंगला गँगस्टरची खतरनाक धमकी, ऑडिओ नोटमधील एक-एक ओळ आली समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल