TRENDING:

Gautami Patil Shiv Thakare : हे कधी झालं! गौतमी पाटील, शिव ठाकरेचं लग्न पाहून चाहते थक्क; दोघांनी सांगितली आपली संपूर्ण 'लव्ह स्टोरी'

Last Updated:
Gautami Patil Shiv Thakare Wedding : गौतमी पाटील आणि बिग बॉस फेम शिव ठाकरेच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
advertisement
1/7
हे कधी झालं! गौतमी पाटील, शिव ठाकरेचं लग्न पाहून चाहते थक्क; दोघांनी सांगितली आपली संपूर्ण 'लव्ह स्टोरी'
गेल्या महिन्यात गौतमी पाटीलचा महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता ओंकार राऊतसोबतचा लग्नाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि सगळ्यांना धक्का बसला होता. नंतर हे लग्न तिच्या गाण्याचं शूटिंग होतं असं समजलं. दरम्यान आता महिनाभराने गौतमी पाटीलचे पुन्हा लग्नाचे फोटो समोर आले आहेत. ज्यात तिने बिग बॉस फेम शिव ठाकरेसोबत लग्न केल्याचं दिसतं आहे.
advertisement
2/7
गौतमी पाटीलने स्वत: तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. ज्यात शिव ठाकरे तिचा नवरा आहे. तिने त्याचा हात हातात धरून फोटो काढले आहेत. एका फोटोत शिवने तिला उचलूनही घेतलं आहे.
advertisement
3/7
गौतमी आणि शिव यांच्या लग्नाचे फोटो पाहून अनेक चाहत्यांना धक्का बसला. बहुतेकांना त्यांची जोडी आवडली आहे, पण हे कधी झालं, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.याआधी शिव ठाकरेनेसुद्धा हे फोटो शेअर केले होते. ज्याला त्याने फायनली असं कॅप्शन दिलं होतं. त्यात त्याने नवरीचा चेहरा दाखवला नव्हता.
advertisement
4/7
शिवने फोटो शेअर केल्यानंतर त्याने गुपचूप लग्न उरकल्याच्या चर्चा होत्या. पण नंतर त्याने यामागील सत्य सांगितलं होतं. आता गौतमीनेही फोटो शेअर केल्यावर त्यांच्या लग्नाच्या चर्चा होऊ लागल्या. दोघांनीही यामागील स्टोरी सांगितली आहे.
advertisement
5/7
गौतमी आणि शिव यांचं लग्न खरंखरं नाही तर तो एका प्रोजेक्टचा भाग आहे. गौतमी आणि शिव यांचं हे गाणं आहे. गाण्याच्या शूटिंगदरम्यान हे फोटो काढण्यात आले जे गौतमीने शेअर केले आहेत.
advertisement
6/7
गौतमीने आणखी काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात शिव आणि गौतमी पिंक ड्रेसमध्ये समुद्रकिनारी दिसत आहेत. एका फोटोत गौतमी कोळी लूकनध्येही दिसते.
advertisement
7/7
शिव आणि गौतमी यांचं मासोळी सोन्यावाणी हे गाणं रिलीज झालं आहे. युट्युबवर हे गाणं उपलब्ध आहे. त्याच्याच शूटिंगचे हे फोटो आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Gautami Patil Shiv Thakare : हे कधी झालं! गौतमी पाटील, शिव ठाकरेचं लग्न पाहून चाहते थक्क; दोघांनी सांगितली आपली संपूर्ण 'लव्ह स्टोरी'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल