BBM 6 : संस्कृतीच्या एव्हिक्शननंतर दुसऱ्याच दिवशी 'बिग बॉस'चा मोठा धक्का! इतरांची कठपुतळी असलेले सदस्य घरातून 'आऊट'
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Nomination Task : बिग बॉस मराठी 6 दहाव्या आठवड्यात संस्कृती साळुंखे घराबाहेर गेल्यानंतर आता अकराव्या आठवड्याच्या सुरुवातीला बिग बॉसने आणखी एक मोठा धक्का दिला आहे.
advertisement
1/7

17 स्पर्धकांपासून सुरू झालेलं बिग बॉस मराठीचा सहावा सीझन, ज्यात नंतर 4 वाइल्ड कार्ड एंट्री झाल्या. दहाव्या आठवड्यात संस्कृती साळुंखेचं एव्हिक्शन झालं. 22 मार्च रोजी संस्कृती बिग बॉसच्या घरातून बाहेर गेली. संस्कृतीच्या एव्हिक्शननंतर दुसऱ्या दिवशी आठवड्याच्या सुरुवातीलाच बिग बॉसने मोठा धक्का दिला आहे.
advertisement
2/7
आता बिग बॉस मराठीच्या घरात टॉप 10 सदस्य राहिले आहेत. यामध्ये तन्वी कोलते, रेवा कौरासे, राखी सावंत, अनुश्री माने, दिपाली सय्यद, प्रभू शेळके, विशाल कोटियन, संकेत पाठक, सागर कारांडे, राकेश बापट यांचा समावेश आहे.
advertisement
3/7
आता अकरावा आठवडा सुरू झाला आहे आणि या आठवड्यातील पहिल्या दिवसाचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात नॉमिनेशन टास्क देण्यात आला आहे. या आठवड्यात कोणता सदस्य घरातून बाहेर जायला हवा यासाठी सदस्य एकमेकांना नॉमिनेट करत आहेत. या सदस्यांना प्रेक्षकांच्या वोटिंगमार्फत घरात राहण्यासाठी एक संधी मिळते.
advertisement
4/7
आठवड्याच्या शेवटी नॉमिनेट झालेल्या आणि प्रेक्षकांचीही साथ न मिळालेल्या सदस्याचं एव्हिक्शन होतं. तो घरातून बाहेर जातो. दर आठवड्यावला नॉमिनेशनचे वेगवेगळे टास्क असतात. या आठवड्यात कटपुतळीचा टास्क आहे.
advertisement
5/7
म्हणजे घरातील सदस्यांचे दोन दोऱ्यांमध्ये हात बांधून त्यांना कटपुतलीसारखं अडकवून त्यांचं नॉमिनेशन केलं जातं आहे.
advertisement
6/7
ज्या सदस्याचं स्वत:चं काहीच मत नाही, ज्या सदस्याचा गेम दिसत नाही, जो सदस्य इतर सदस्याच्या तालावर किंवा त्याच्या इशाऱ्यावर नाचताना दिसतो, जो सदस्य दुसऱ्या सदस्याचंच ऐकतो आणि तेच करतो, तो सदस्य म्हणजे दुसऱ्याच्या हातातील कटपुतली. अशा सदस्यांना नॉमिनेट करायचं आहे.
advertisement
7/7
इतरांच्या हातातील कठपुतळी बनलेले सदस्य नॉमिनेट होणार, यातून कोण वाचणार, कोणाचा गेम ओव्हर होणार? हे पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
BBM 6 : संस्कृतीच्या एव्हिक्शननंतर दुसऱ्याच दिवशी 'बिग बॉस'चा मोठा धक्का! इतरांची कठपुतळी असलेले सदस्य घरातून 'आऊट'